इराण युद्धावरून अमेरिकेत पहिला बळी जाणार; संरक्षण मंत्र्यांना हटविण्याची तयारी, शाळेवर हल्ल्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 17:27 IST2026-04-16T17:27:26+5:302026-04-16T17:27:59+5:30

Pete Hegseth Impeachment: अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्यावर महाभियोग; इराणमधील शाळा हल्ल्याचा गंभीर आरोप.

Impeachment articles filed against US Defense Secretary Pete Hegseth over Iran school strike | इराण युद्धावरून अमेरिकेत पहिला बळी जाणार; संरक्षण मंत्र्यांना हटविण्याची तयारी, शाळेवर हल्ल्याचा गंभीर आरोप

इराण युद्धावरून अमेरिकेत पहिला बळी जाणार; संरक्षण मंत्र्यांना हटविण्याची तयारी, शाळेवर हल्ल्याचा गंभीर आरोप

वॉशिंग्टन : ट्रम्प प्रशासनातील संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्या विरोधात अमेरिकन संसदेत महाभियोग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. इराणमधील एका मुलींच्या शाळेवर झालेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यात १७० निष्पाप जीवांचा बळी गेल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.

नेमके आरोप काय आहेत?
डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांनी हेगसेथ यांच्यावर ६ प्रमुख आरोप लावले आहेत:
१. इराण विरुद्ध विनापरवाना युद्ध: संसदेची मंजुरी न घेता इराणविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केल्याचा आरोप.
२. युद्ध गुन्हे : २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणच्या मिनाब भागातील एका गर्ल्स स्कूलवर अमेरिकन 'टॉमहॉक' क्षेपणास्त्र पडल्याचा दावा. यात १६८ हून अधिक शाळकरी मुली आणि शिक्षकांचा मृत्यू झाला होता.
३. गुप्त माहितीची असुरक्षित हाताळणी: लष्करी मोहिमेची गोपनीय माहिती खाजगी चॅट ग्रुपवर शेअर केल्याचा आरोप.
४. सत्तेचा गैरवापर: राजकीय कारणांसाठी लष्करी निर्णयांवर प्रभाव टाकल्याचा ठपका.

पेंटागॉनची भूमिका
पेंटागॉनने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून हा एक 'राजकीय स्टंट' असल्याचे म्हटले आहे. इराणमधील कारवाई ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक होती आणि नागरी वस्त्यांना कधीही लक्ष्य करण्यात आले नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, सुरुवातीच्या तपासात जुन्या माहितीमुळे लष्करी तळाऐवजी शाळेवर चुकून हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Web Title : ईरान हमले पर अमेरिकी रक्षा मंत्री पर महाभियोग का खतरा

Web Summary : ईरान में स्कूल पर हमले के आरोप में अमेरिकी रक्षा मंत्री हेगसेथ पर महाभियोग का खतरा मंडरा रहा है, जिसमें 170 लोगों की मौत हुई थी। उन पर अनधिकृत सैन्य कार्रवाई, युद्ध अपराध और सत्ता के दुरुपयोग का आरोप है। पेंटागन ने आरोपों को राजनीतिक स्टंट बताया है।

Web Title : US Defense Secretary Faces Impeachment Over Iran School Attack

Web Summary : US Defense Secretary Hegegseth faces impeachment over an alleged Iran school attack, resulting in 170 deaths. He is accused of unauthorized military action, war crimes, and misuse of power. The Pentagon denies the charges, calling them a political stunt, while admitting a possible mistaken target selection.