'इराणनं ऐकलं नाही, तर आम्ही एकटे हल्ला करू", इस्रायलचा अमेरिकेला इशारा; खामेनेईसुद्धा तयारीत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 02:11 IST2026-02-10T02:10:40+5:302026-02-10T02:11:55+5:30
अमेरिका आणि इराणमध्ये कुठल्याही क्षणी युद्ध भडकू शकते असी स्थिती असतानाच, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या आगामी वाशिंग्टन दौऱ्याने ...

'इराणनं ऐकलं नाही, तर आम्ही एकटे हल्ला करू", इस्रायलचा अमेरिकेला इशारा; खामेनेईसुद्धा तयारीत?
अमेरिका आणि इराणमध्ये कुठल्याही क्षणी युद्ध भडकू शकते असी स्थिती असतानाच, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या आगामी वाशिंग्टन दौऱ्याने खळबळ उडाली आहे. इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम, हा इस्रायलच्या अस्तित्वासाठी धोका आहे, असे म्हणत, इस्रायलने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा दिला आहे. इराणने 'रेड लाईन' ओलांडल्यास आपण अमेरिकेच्या मदतीशिवाय स्वबळावर लष्करी कारवाई करू, असे इस्रायलने म्हटले आहे.
फ्रीडम ऑफ एक्शन सुरक्षित -
'जेरुसलेम पोस्ट'च्या वृत्तानुसार, इराणने अद्याप 'रेड लाईन' ओलांडली नसली तरी, इस्रायल त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. आपल्या संरक्षणासाठी 'फ्रीडम ऑफ एक्शन' (कारवाईचे स्वातंत्र्य) अबाधित राखणार असून, शेजारील देशांना धोका निर्माण होईल, अशी शस्त्रे इराणला विकसित करू देणार नाही, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे येमेनमधील हूतींविरुद्ध केलेल्या कारवाईप्रमाणे, 'मर्यादित' स्वरुपाची कारवाई करू शकतात, अशी भीती इस्रायलच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अशा मर्यादित हल्ल्यांमुळे इराणची मुख्य लष्करी क्षमता सुरक्षित राहील. मात्र, त्याचा फटका भविष्यात इस्रायलला सहन करावा लागू शकतो, असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
खामेनेई याचे जनतेला आवाहन:
पंतप्रधान नेतन्याहू यांच्यासह हवाई दलाचे भावी कमांडर ब्रिगेडियर जनरल ओमर टिशलर हेदेखील ११ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटल्या प्रमाणे, तेहरान चर्चेदरम्यान क्षेपणास्त्र कार्यक्रम किंवा अण्वस्त्र प्रकल्पासंदर्भात कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी, "जोवर शत्रू निराश होत नाही, तोवर एखाद्या राष्ट्रावर अत्याचार होत असतात. खामेनेई यांच्या हवाल्याने सिन्हुआ वृत्त संस्थेने म्हटले आहे की, शत्रूला निराश व्हावेच लागेल.