"PM मोदींना फोन करून म्हणालो, 200% टॅरिफ लावेन! 11 महागडी विमानं पडली..."; युद्ध रोखल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यात नवा ट्विस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 22:28 IST2026-02-19T22:28:06+5:302026-02-19T22:28:56+5:30

व्हाईट हाऊसमध्ये 'बोर्ड ऑफ पीस'च्या बैठकीत बोलताना पाकिस्ताचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा संदर्भ देत. ट्रम्प म्हणाले, "शहबाज शरीफ यांनी आमच्या चीफ ऑफ स्टाफसमोर कबूल केले, ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्ध थांबवून अडीच कोटी लोकांचे प्राण वाचवले. दोन्ही देशांची विमानं पडत होती."

I called PM Modi and said I will impose 200 percent tariff 11 expensive planes crashed New twist in Donald Trump's claim of preventing war | "PM मोदींना फोन करून म्हणालो, 200% टॅरिफ लावेन! 11 महागडी विमानं पडली..."; युद्ध रोखल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यात नवा ट्विस्ट 

"PM मोदींना फोन करून म्हणालो, 200% टॅरिफ लावेन! 11 महागडी विमानं पडली..."; युद्ध रोखल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यात नवा ट्विस्ट 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्ष रोखल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशांना फोन करून आपण २०० टक्के टॅरिफ (कर) लावण्याची धमकी दिली. यानंतरच दोन्ही देशांनी युद्ध थांबवण्यास सहमती दर्शविली, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. एवढेच नाही तर, सुरुवातीला संघर्षादरम्यान पाच लढाऊ विमाने पाडण्यात आल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. आता ते त्या संघर्षात ११ लढाऊ विमाने पाडण्यात दावा करत आहेत.

व्हाईट हाऊसमध्ये 'बोर्ड ऑफ पीस'च्या बैठकीत बोलताना पाकिस्ताचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा संदर्भ देत. ट्रम्प म्हणाले, "शहबाज शरीफ यांनी आमच्या चीफ ऑफ स्टाफसमोर कबूल केले, ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्ध थांबवून अडीच कोटी लोकांचे प्राण वाचवले. दोन्ही देशांची विमानं पडत होती."

"मी दोघांनाही फोन केला. मी त्यांना (शहबाज शरीफ) चांगले ओळखत नव्हतो, पण मी पंतप्रधान मोदींना चांगले ओळखतो. मी फोन केला आणि म्हणालो, 'मी डील करणार नाही. जर तुम्ही लोक लढत राहिलात आणि हे संपवले नाही तर मी २०० टक्के ट्रॅरीफ लावेन. दोघांनाही लढायचे होते. पण जेव्हा पैशाचा प्रश्न येतो तेव्हा पैशासारखे काहीच नसते. जेव्हा खूप पैसे गमावण्याची वेळ येते तेव्हा ते म्हणाले, 'कदाचित आपल्याला लढायचे नाही.' यानंतर, दोन्ही बाजूंनी युद्धबंदीवर सहमती दर्शविली. दरम्यान, ट्रम्प यांनी दावा केला की संघर्षात ११ लढाऊ विमाने पाडण्यात आली, जी खूप महागडी होती.

भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे - 
असा दावा करण्याची ट्रम्प यांचीही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही त्यांनी अनेकवेळा असा दावा केला आहे आणि भारताने तो नेहमीच फेटाळून लावला आहे. कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीने सीजफायर झाले नसल्याचे भारताने सुरुवातीपासूनच स्पष्ट केले आहे.
 

Web Title : ट्रंप का दावा: टैरिफ की धमकी से भारत-पाक युद्ध रुका, 11 विमान गिरे।

Web Summary : डोनाल्ड ट्रंप का दावा है कि उनकी टैरिफ की धमकी से भारत-पाक युद्ध रुका। उन्होंने 200% टैरिफ की धमकी दी थी, जिससे संघर्ष रुका। ट्रंप ने अब 11 विमान गिराने का दावा किया है, जो पहले बताए गए संख्या से अधिक है। भारत ने ट्रंप के मध्यस्थता के दावों का लगातार खंडन किया है।

Web Title : Trump claims tariff threat stopped India-Pakistan war, 11 planes downed.

Web Summary : Donald Trump claims his tariff threat stopped India-Pakistan war. He alleges he threatened 200% tariffs, halting conflict. Trump now claims 11 planes were downed, a higher number than previously stated. India has consistently denied Trump's claims of mediation.