शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण करुन जबरदस्तीने धर्मांतर; मुस्लीम युवकाशी लावला निकाह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 12:20 IST

वृत्तानुसार, मुलीला लग्नाच्या मंडपातून पळवून नेले आणि नंतर जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारुन तिचे लग्न केले.

ठळक मुद्देधर्म परिवर्तन करुन जबरदस्तीने केला निकाहअपहरणकर्त्यावर कारवाई केल्याची माहिती दिली नाही.पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मटियारी जिल्ह्यातील घटना

इस्लामाबाद - काही दिवसांपूर्वीच भारताने शेजारील राष्ट्रातून आलेल्या शरणार्थी अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व देण्याचा कायदा पारित केला. मुस्लीम बहुल राष्ट्रात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाने केला मात्र सरकारने आणलेल्या या कायद्यामुळे देशाचं धर्माच्या नावावर विभाजन होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. याच दरम्यान पाकिस्तानच्या सिंधमध्ये हिंदू वधूचं अपहरण प्रकरणात आता एक नवीन बाब समोर आली आहे.

वृत्तानुसार, मुलीला लग्नाच्या मंडपातून पळवून नेले आणि नंतर जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारुन तिचे लग्न केले. इम्रान खान एकीकडे नवीन पाकिस्तान बनवण्याचा दावा करत असताना त्यांच्या कार्यकाळात हिंदू महिलांचे अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतर घडवण्याच्या घटना थांबत नसल्याचं यातून पुन्हा एकदा उघड झालं. कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आहे. पूर्वी या घटनेला प्रेम प्रकरणांशी जोडलं जात होतं. माहितीनुसार पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मटियारी जिल्ह्यातील हाला शहरात भारतीबाई नावाच्या हिंदू मुलीचा विवाह सोहळा सुरु होता. त्याचवेळी काही लोकांनी तिच्या घरातून मुलीचं अपहरण केले. अखिल पाकिस्तान हिंदू पंचायतचे सरचिटणीस रवी धवानी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार दोन आठवड्यांत हिंदू महिलांना लक्ष्य केले जाण्याची ही तिसरी घटना आहे. या महिन्याच्या 15 तारखेला एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलास जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं. 

धर्म परिवर्तन करुन जबरदस्तीने केला निकाहधवानी म्हणाले की, भारतीबाईंचे अपहरण करून त्यांना सिंधच्या हाला शहरातून कराचीच्या बनोरिया येथे नेण्यात आले. जिथे तिचे जबरदस्तीने धर्मांतर केले गेले. यानंतर शाहरुख मेनन नावाच्या मुस्लिम युवकाशी तिचं लग्न लावण्यात आले. मुलीच्या कुटुंबीयांना पंचायतीच्या मदतीने पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात आले. पोलिसांनी मुलीला कराचीहून परत सिंध येथे आणले आणि तिला न्यायालयात हजर केले.

अपहरणकर्त्यावर कारवाई केल्याची माहिती दिली नाही. युवतीचं अपहरण करणाऱ्या मुलावर काय कारवाई झाली याची माहिती पोलिसांनी अद्याप दिलेली नाही.  मीरपूर खासमध्ये चार दिवसांपूर्वी एका 25 वर्षीय हिंदू महिलेचे अपहरण करून धर्मांतर केले गेले असं धवानी यांनी सांगितले.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानHinduहिंदूMuslimमुस्लीमKidnappingअपहरण