शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाकमध्ये हाय अलर्ट; २१ गजाआड

By admin | Updated: November 4, 2014 02:08 IST

वाघा सीमेवर रविवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर, एका आत्मघाती हल्लेखोरासह २१ संशयिताना आज ताब्यात घेण्यात आले

लाहोर : वाघा सीमेवर रविवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर, एका आत्मघाती हल्लेखोरासह २१ संशयिताना आज ताब्यात घेण्यात आले असून, स्फोट झालेल्या भागात आणखी बॉम्ब व स्फोटके भरलेले जाकीट आढळल्यानंतर संपूर्ण देशभर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान रविवारी झालेल्या हल्ल्यातील मृतांचा आकडा आता ६१ वर गेला आहे. पंजाब रेंजरच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार स्फोटके व आत्मघातकी हल्ला करण्यासाठी वापरले जाणारे स्फोटके भरलेले जाकीट घटनास्थळी सापडले. आत्मघाती जाकिटात स्फोटके व बॉल बेअरिंग भरलेली होती. बॉम्बनाशक पथकाने ती निकामी केली. लाहोर शहरात मोहरम मिरवणुकाही असल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. लाहोरपासून ३५० कि.मी. वर असलेल्या मूलतान येथे एका संशयित आत्मघाती हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. लाहोर पोलिसांनी रविवारी १७ वर्षाच्या अब्दुल रेहमान याचे चित्र प्रसिद्ध केले होते. तो लाहोरमधून गेल्या महिन्यात बेपत्ता झाला होता. मूलतान जिल्ह्यात एका घरावर छापा टाकून या अब्दुल रेहमान याला पकडण्यात आले. रविवारी झालेल्या हल्ल्यात ६१ लोक मरण पावले असून, त्यात १० महिला व ८ मुले आणि तीन सुरक्षा कर्मचारी आहेत. (वृत्तसंस्था)