इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ८ जणांचा मृत्यू, ८० हून अधिक बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 06:00 IST2026-01-25T05:59:17+5:302026-01-25T06:00:11+5:30
Landslides In Indonesia: इंडोनेशियामधील जावा बेटांवर मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८२ लोक बेपत्ता झाले आहेत. पाणी आणि चिखलामुळे मदतकार्यात अडथळे येत असून, येथे मदतीसाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ८ जणांचा मृत्यू, ८० हून अधिक बेपत्ता
इंडोनेशियामधील जावा बेटांवर मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८२ लोक बेपत्ता झाले आहेत. पाणी आणि चिखलामुळे मदतकार्यात अडथळे येत असून, येथे मदतीसाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जावा बेटांवर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे पश्चिम जावा प्रांतामधील वेस्ट बांडूंग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हाहाकार उडाला आहे. डोंगराळ प्रदेशातून चिखल, दगड आणि झाडे वाहून आली आहेत. त्याखाली ३४ घरे दबली आहेत.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन एजन्सीचे प्रवक्ते अब्दुल मुहारी यांनी सांगितले की, या दुर्घटनेमध्ये सुमारे ८२ लोक वाहून आलेल्या चिखलाखाली दबले गेले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. तसेच २४ लोक सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाले आहेत.
या भूस्खलनाचा सर्वात मोठा परिणाम पासिर कुनिंग वस्तीमध्ये झाला आहे. येथे आठ जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मदत कार्यामध्ये गुंतलेले कर्मचारी आणि स्थानिक लोक ढिगााऱ्याखाली अडकलेल्या लोकांची सुटका करण्यामध्ये गुंतले आहेत.