ब्रिटनमध्ये गुरुद्वारातून सोन्याच्या वस्तूंची चोरी

By Admin | Updated: October 11, 2015 03:07 IST2015-10-11T03:07:19+5:302015-10-11T03:07:19+5:30

दक्षिण ब्रिटनमधील एका गुरुद्वारात चोरट्यांनी धुडगूस घालून मोडतोड केली. चोरट्यांनी २५ हजार पाऊंड रोख रक्कम आणि सोन्याच्या बहुमोल वस्तूंची चोरीही केली.

Gold stolen gold from the gurdwara in Britain | ब्रिटनमध्ये गुरुद्वारातून सोन्याच्या वस्तूंची चोरी

ब्रिटनमध्ये गुरुद्वारातून सोन्याच्या वस्तूंची चोरी

लंडन : दक्षिण ब्रिटनमधील एका गुरुद्वारात चोरट्यांनी धुडगूस घालून मोडतोड केली. चोरट्यांनी २५ हजार पाऊंड रोख रक्कम आणि सोन्याच्या बहुमोल वस्तूंची चोरीही केली.
गेल्या महिन्याच्या अखेरीस पश्चिम ससेक्समधील क्राऊली येथील गुरुद्वारा साहीबमध्ये ही घटना घडल्याचे ‘शीख अपडेटस्’ या दैनिकाने म्हटले आहे. २५ आणि २६ सप्टेंबरच्या मध्यरात्री झालेल्या या चोरीचा तपास पोलीस करीत आहेत, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले.

 

Web Title: Gold stolen gold from the gurdwara in Britain