शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर ‘बायको’ आणि १ अब्ज डॉलर द्या, नाहीतर..; जगात एकीकडे युद्ध अन् दुसरीकडे भलतेच उद्योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 07:44 IST

कैनेरुगाबानं अलीकडेच सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त पोस्ट केल्या. त्यानं विरोधी नेते बॉबी वाइन यांना शिरच्छेदाची धमकी दिली, ज्यावर मोठा वाद झाला. नंतर त्यानं तो विनोद असल्याचं सांगत माफी मागितली.

जगात सध्या सगळीकडे युद्धाच्या बातम्या आणि त्याविषयीच्या चर्चा सुरू असताना युगांडामध्ये (आणि तुर्कीत) वेगळंच काही घडत आहे. त्यामुळे अख्खं जग चक्रावलं आहे आणि अनेकांना धक्का बसला आहे. युगांडाचा आर्मी चीफ असलेला राष्ट्राध्यक्षांचा मुलगा मुहूजी कैनेरुगाबानं तुर्कीला काय धमकी द्यावी आणि त्यांच्याकडे काय मागणी करावी? - त्यानं तुर्कीला धमकी दिली आहे की, त्यांनी तातडीनं आम्हाला एक अब्ज डॉलर (९००० कोटी रुपये) आणि देशातील ‘सगळ्यात सुंदर महिला’ मला पत्नी म्हणून द्यावी. ही मागणी पूर्ण नाही झाली तर तुर्कीसोबतचे कूटनीतिक संबंध संपवले जातील आणि तुर्किश एअरलाइन्सवर बंदी घातली जाईल. 

कैनेरुगाबानं ‘एक्स’वर लिहिलं की जर तुर्कीनं आमच्या समस्या सोडवल्या नाहीत तर महिनाभरात त्यांच्याबरोबरचे संबंध तोडले जातील आणि त्यांनी पैसे दिले नाहीत, तर आम्ही त्यांचं दूतावास बंद करू! त्यानं युगांडातील लोकांना तुर्कीचा प्रवास टाळण्याचाही सल्ला दिला आहे आणि इस्रायलच्या समर्थनार्थ एक लाख सैनिक पाठवण्याची ऑफर दिली आहे. कैनेरुगाबानं पोस्टमध्ये तुर्कीवर आरोप केला की त्यांनी सोमालियात इन्फ्रास्ट्रक्चर, पोर्ट आणि एअरपोर्ट प्रोजेक्ट्समधून फायदा घेतला, तर युगांडानं अल-शबाबसारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध लढण्याचं ओझं उचललं. याच आधारावर त्यानं एक अब्ज डॉलरची मागणी केली आहे. कैनेरुगाबानं अलीकडेच सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त पोस्ट केल्या. त्यानं विरोधी नेते बॉबी वाइन यांना शिरच्छेदाची धमकी दिली, ज्यावर मोठा वाद झाला. नंतर त्यानं तो विनोद असल्याचं सांगत माफी मागितली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्यानं आपलं ‘एक्स’ अकाउंट डिलीट केलं होतं. त्यानंतर ‘I am back’ असं लिहून परत येण्याची घोषणा केली आणि जग हादरवून टाकू, असा इशाराही दिला होता. परत आल्यानंतर त्यानं सुरक्षा यंत्रणांना आदेश दिले की सैन्यासारखा गणवेश घातलेला कोणीही दिसला तर त्याला ताबडतोब अटक करा.  ५० वर्षांचा कैनेरुगाबा हा त्याचे वडील आणि राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांचा संभाव्य उत्तराधिकारी मानला जातो. मात्र, मुसेवेनी यांनी याला नकार दिला आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांचं मत आहे की तो हळूहळू राजकारणात स्वतःची पकड मजबूत करत आहे आणि भविष्यात राष्ट्राध्यक्षपदासाठीही दावा करू शकतो. युगांडात मुसेवेनी १९८६ पासून सत्तेत आहेत. कैनेरुगाबाची ही पहिलीच वेळ नाही की त्यानं अशा विचित्र मागण्या आणि धमक्या दिल्या आहेत. २०२२मध्ये त्यानं इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी लग्नाच्या बदल्यात १०० गायी देण्याची ऑफर दिली होती! त्यावेळी त्यानं म्हटलं होतं की, इटलीनं प्रस्ताव नाकारला तर रोमवर ताबा घ्यावा लागेल. या विधानानंतर त्याचे वडील राष्ट्राध्यक्ष मुसेवेनींना माफी मागावी लागली होती.

२०२२मध्ये त्यानं केनियावर हल्ला करण्याची धमकीही दिली होती. त्यानं म्हटलं होतं की, नैरोबीवर ताबा मिळवायला दोन आठवडेही लागणार नाहीत. त्यानंतर त्याला तात्पुरतं पदावरून हटवलं गेलं आणि सरकारला माफी मागावी लागली. याआधी त्यानं रशिया-युक्रेन युद्धात व्लादिमीर पुतिन यांना समर्थन दिलं होतं आणि केनियाच्या तुर्काना समुदायाबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ugandan General Demands Wife, $1 Billion from Turkey, or War!

Web Summary : Ugandan General Muhoozi Kainerugaba threatened Turkey, demanding $1 billion and a beautiful wife. He warned of cutting diplomatic ties and banning Turkish Airlines if demands aren't met. He also offered troops to Israel and criticized Turkish infrastructure projects in Somalia.
टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी