कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:11 IST2025-06-17T11:11:20+5:302025-06-17T11:11:20+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदीही G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कनॅनिस्किस येथे पोहोचले आहेत...

G7 summit Warning to Tehran Iran can never made a nuclear weapon All these countries support Israel | कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा

कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाकडे सपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यातच, जी-७ शिखर परिषदेतून इराणला एक मोठा इशारा देण्यात आला आहे. यावेळच्या जी-७ शिखर परिषदेचे आयोजन कॅनडामध्ये करण्यात आले आहे. जी-७ च्या सर्वोच्च नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी करत तेहरानला इशारा दिला आहे. 'इराणला कधीही अण्वस्त्रे बनवण्याची परवानगी दिली जाणार नाही,' असे जी-७ नेत्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील या शिखर परिषदेसाठी उपस्थित आहेत.

जी-7 शिखर परिषदेतील नेत्यांनी संबंधित निवेदनात म्हटले आहे, "इस्रायलला आपले संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. नागरिकांचे संरक्षणही महत्वाचे आहे. इराण हा प्रादेशिक अस्थिरता आणि दहशतवादाचे एक मुख्य कारण आहे. इराण कधीही अण्वस्त्रे बाळगू शकत नाही, यावर आम्ही ठाम आहोत."

"इराण प्रश्न सुटला की शांतता येईल" -
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह सर्वच जी-७ नेत्यांनी मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावावर प्रतिक्रिया दिली आहे. "जर इराणचा प्रश्न सुटला, तर या प्रदेशातील तणाव कमी होऊ शकतो. यात गाझा युद्धविरामाचाही समावेश आहे. 

जी-7 परिषदेसाठी कॅनडाला पोहोचले पंतप्रधान मोदी -
पंतप्रधान नरेंद्र मोदीही G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कनॅनिस्किस येथे पोहोचले आहेत. गेल्या दशकात मोदींचा हा पहिलाच कॅनडा दौरा आहे. दरम्यान, पंतप्रधान जागतिक नेत्यांना भेटतील आणि ऊर्जा सुरक्षा आणि तंत्रज्ञानासह महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी सोमवारी सायंकाळी सायप्रसहून कॅनडाला पोहोचले. १६ जून ते १७ जून असे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी सलग सहाव्यांदा जी-७ शिखर परिषदेत सहभागी होत आहेत.

Web Title: G7 summit Warning to Tehran Iran can never made a nuclear weapon All these countries support Israel