एपस्टीनशी संबंध, नॉर्वेच्या माजी पंतप्रधानांवर आरोप; निवासस्थान, मालमत्तांवर छापे, पोलिस चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 07:17 IST2026-02-15T07:16:39+5:302026-02-15T07:17:17+5:30

जगलँड १९९६ ते १९९७ या काळात नॉर्वेचे पंतप्रधान होते. या काळात त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. जगलँड यांनी नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री व ‘काउन्सिल ऑफ युरोप’चे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले.

Former Norwegian Prime Minister accused of links to Epstein; Raids on residence, properties, police investigation underway | एपस्टीनशी संबंध, नॉर्वेच्या माजी पंतप्रधानांवर आरोप; निवासस्थान, मालमत्तांवर छापे, पोलिस चौकशी सुरू

एपस्टीनशी संबंध, नॉर्वेच्या माजी पंतप्रधानांवर आरोप; निवासस्थान, मालमत्तांवर छापे, पोलिस चौकशी सुरू

ओस्लो : नॉर्वेचे माजी पंतप्रधान थॉरब्यर्न जॅगलँड यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच त्यांचे कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्याशी कथित संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गुरुवारी नॉर्वे पोलिसांनी जगलँड यांच्या निवासस्थानासह त्यांच्या अन्य दोन मालमत्तांवर छापे टाकले. या छाप्यात नेमके काय आढळले याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती उघड केलेली नाही.

राजस्थानातील भाजप खासदाराची रेंज रोव्हर कार खाक; नाशिक-मुंबई महामार्गावर घटना : सुदैवाने खासदारासह सहकारी बचावले

जगलँड १९९६ ते १९९७ या काळात नॉर्वेचे पंतप्रधान होते. या काळात त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. जगलँड यांनी नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री व ‘काउन्सिल ऑफ युरोप’चे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले. त्यांनी पदावर असताना एपस्टीनकडून महागड्या भेटवस्तू, प्रवास खर्च व काही पैसे उसने घेतल्याचा आरोप आहे. जगलँड  आरोप फेटाळले आहेत.

राजघराणेही वादात, राजपुत्राचेही संबंध

हे प्रकरण अशा वेळी समोर आले आहे जेव्हा नॉर्वेचे राजघराणेदेखील अनेक वादांचा सामना करत आहे. नॉर्वेच्या राजपुत्राचे मॅरिअस बोर्ग यांचाही एपस्टीनशी संबंध असल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली होती.

या घटनेनंतर नॉर्वेतील स्वयंसेवी संघटनांनी त्यांच्याशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title : नॉर्वे के पूर्व प्रधानमंत्री पर एपस्टीन से संबंध के आरोप, छापे और जांच शुरू

Web Summary : नॉर्वे के पूर्व प्रधानमंत्री थॉर्बजोर्न जगलैंड पर भ्रष्टाचार के आरोप और जेफ्री एपस्टीन से संबंध होने का आरोप है। पुलिस ने उनके आवास पर छापे मारे, उनके कार्यकाल के दौरान एपस्टीन से उपहार और धन स्वीकार करने के दावों की जांच कर रही है। जगलैंड ने आरोपों से इनकार किया। नॉर्वे का शाही परिवार भी इसी तरह के संबंधों को लेकर जांच का सामना कर रहा है।

Web Title : Ex-Norway PM Accused of Epstein Ties, Raids and Probe Launched

Web Summary : Former Norwegian Prime Minister Thorbjørn Jagland faces corruption allegations and alleged ties to Jeffrey Epstein. Police raided his properties, investigating claims of accepting gifts and funds from Epstein during his tenure. Jagland denies the charges. The Norwegian royal family is also facing scrutiny over similar connections.