शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 11:49 IST

डोनाल्ड ट्रम्प आणि सिरियाचे प्रमुख अहमद अल-शरा यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली.

वॉशिंग्टन : सिरियाचे राष्ट्रपती अहमद अल-शरा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची  व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. ही भेट ऐतिहासिक ठरली, कारण अल-शरा हे पूर्वी अल-कायदाचे वरिष्ठ कमांडर राहिले आहेत आणि एकेकाळी अमेरिकेने त्यांना दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते. मात्र, सीरियाची सत्ता हाती घेतल्यानंतर त्यांची हीव्हाईट हाऊसला ही पहिलीच भेट आहे.

या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी आपल्या नेहमीच्या विनोदी अंदाजात अल-शरा यांच्याशी काही हलक्या फुलक्या गप्पा मारल्या. या भेटीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ट्रम्प यांनी अल-शरा यांना एक परफ्युमची बाटली भेट दिल्याचे दिसते. तसेच, दुसरी बाटली त्यांच्या पत्नीकरीताही दिली. यानंतर ट्रम्प यांनी हसत विचारले, “तुम्हाला किती बायका आहेत?” यावर अल-शरा यांनी उत्तर दिले, “फक्त एक.” यानंतर खोलीत उपस्थित सर्वजण हसू लागले.

अल-शरा यांनी काय दिले? 

अल-शरा यांनीही ट्रम्प यांना काही प्रतीकात्मक भेटवस्तू दिल्या, ज्यात प्राचीन सिरियन कलाकृतींच्या प्रतिकृती होत्या. त्यांनी सांगितले की, त्यात इतिहासातील पहिली वर्णमाला आणि पहिले टपाल तिकीटाचा समावेश होता.

रदरम्यान, अल-शरा यांच्या भूतकाळाबद्दल ट्रम्प म्हणाले की, आपल्या सगळ्यांचाच भूतकाळ कठीण असतो, पण त्यांचा तर खरोखरच अवघड होता. खरे सांगायचे झाले, तर तो कठीण भूतकाळ नसता, तर कदाचित त्यांना आज ही संधीच मिळाली नसती.

बदलते अमेरिकन-सिरियन संबंध

1946 मध्ये फ्रान्सपासून सिरियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, कोणत्याही सिरियन नेत्याची ही पहिलीच व्हाईट हाऊसला अधिकृत भेट आहे. अमेरिका आणि सिरिया यांच्यातील संबंधांमध्ये हे एक मोठे वळण मानले जात आहे. या भेटीपूर्वीच अमेरिकेने सिरियावरचे काही निर्बंध 180 दिवसांसाठी तात्पुरते स्थगित केले होते.

सिरियन राष्ट्रपती कार्यालयाच्या माहितीनुसार, अल-शरा यांनी या भेटीत अमेरिकेसोबतचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबाबत आणि प्रादेशिक विषयांवर चर्चा केली. काही काळापूर्वीच अल-शरा यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचा अल-कायदाशी असलेला संबंध हा आता केवळ भूतकाळातील भाग आहे आणि व्हाईट हाऊसमधील बैठकीत या विषयावर कोणतीही चर्चा होणार नाही.

सत्तांतरानंतरचा प्रवास

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये अल-शरा यांनी सिरियामध्ये सत्ता हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालील इस्लामी सैन्यांनी बशर अल-असद यांच्या सरकारचा पराभव केला. ट्रम्प यांनी बैठकीदरम्यान म्हटले, माझे आणि अल-शरा यांचे चांगले संबंध आहेत आणि मला खात्री आहे की ते हे काम उत्तमरीत्या पार पाडतील. या भेटीने केवळ दोन देशांमधील नवा अध्याय सुरू झाला नाही, तर एका माजी दहशतवाद्यापासून जागतिक राजकारणातील प्रमुख नेत्यापर्यंतच्या प्रवास समोर आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-Al-Qaeda Commander Al-Shara and Trump's Historic White House Meeting

Web Summary : Trump met ex-Al-Qaeda commander Al-Shara, now Syria's leader, at White House. He gifted perfume and joked about wives. Al-Shara presented Syrian artifacts. Trump sees improved US-Syria relations after lifting restrictions.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाSyriaसीरियाterroristदहशतवादी