हाफीज सईदला इसिसची भीती

By Admin | Updated: October 18, 2015 01:59 IST2015-10-18T01:59:32+5:302015-10-18T01:59:32+5:30

पाकिस्तानात इस्लामिक स्टेटला (इसिस) बळकट करण्याचे विदेशी शक्तींचे प्रयत्न सरकारने उधळून लावावेत, असे दहशतवादी संघटना जमात उद दावाचा प्रमुख हाफीज सईद याने म्हटले आहे.

Fear of Hafeez Saeedla Isis | हाफीज सईदला इसिसची भीती

हाफीज सईदला इसिसची भीती

लाहोर : पाकिस्तानात इस्लामिक स्टेटला (इसिस) बळकट करण्याचे विदेशी शक्तींचे प्रयत्न सरकारने उधळून लावावेत, असे दहशतवादी संघटना जमात उद दावाचा प्रमुख हाफीज सईद याने म्हटले आहे.
संघटनेच्या मुख्यालयात नमाजदरम्यान उपस्थितांना संबोधित करताना तो म्हणाला, विदेशी शक्ती पाकमध्ये इसिसला बळकट करण्याचा कट रचत आहेत. सरकारने सतर्क राहून असे प्रयत्न उधळून लावायला हवेत.
सिंध प्रांतातील दहशतवादविरोधी विभागाच्या एका अधिकाऱ्याने यास दुजोरा दिला असून इसिसच्या ५३ पाकिस्तानी सदस्यांची यादीही तयार केली आहे. कराचीजवळ झालेल्या हल्ल्यात इसिसचा हात होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Fear of Hafeez Saeedla Isis