Facebook, Twitter, Google threaten to suspend services in Pakistan SSS | Facebook, Google ही पाकिस्तानला कंटाळले, दिला 'हा' इशारा

Facebook, Google ही पाकिस्तानला कंटाळले, दिला 'हा' इशारा

ठळक मुद्देगुगल, फेसबुक आणि ट्विटर या तिन्ही कंपन्या पाकिस्तानला कंटाळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने सोशल मीडियासाठी काही नवे नियम लागू केले आहे. नियमांमध्ये बदल न केल्यास पाकिस्तानमध्ये सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नवी दिल्ली - Facebook, Twitter, Google याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र आता गुगल, फेसबुक आणि ट्विटर या तिन्ही कंपन्या पाकिस्तानला कंटाळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननेसोशल मीडियासाठी काही नवे नियम लागू केले आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सेवा पुरवण्यात समस्या निर्माण होत आहेत. 'एशिया इंटरनेट कॉलिशन'तर्फे (AIC) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे पत्राद्वारे नव्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. नियमांमध्ये बदल न केल्यास पाकिस्तानमध्ये सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

डिजिटल कायद्यावरून या तीन कंपन्यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. फेसबुक, गुगल आणि ट्विटर यासारख्या कंपन्यांवर सेन्सॉरशीप लावण्यात आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'जर पाकिस्तानने डिजिटल सेन्सॉरशीप कायद्यात बदल केला नाही तर पाकिस्तानमधील आपली सेवा बंद करण्यात येईल' असं इम्रान खान यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे. तसेच नव्या नियमांनुसार या कंपन्यांना इस्लामाबादमध्ये आपलं कार्यालय सुरू करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच त्यांना पाकिस्तानमध्ये डेटा सेंटर सुरू करावं लागणार आहे. तसंच त्यांना युजर्सचा डेटाही सरकारसोबत शेअर करावा लागणार आहे. 

एआयसीतर्फे पाठवण्यात आलेल्या पत्रात कंपनी युजर्सचा कोणत्याही प्रकारचा डेटा शेअर करणार नाही कारण ते गोपनीयता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असेल असं नमूद करण्यात आलं आहे. कंपन्यांना नव्या कंपन्यांना या नव्या नियमांमुळे मोठी समस्या निर्माण होणार नाही. पाकिस्तानमध्ये पूर्वीपासूनच ऑनलाईन कंटेंटसाठी कठोर नियम आहेत. परंतु गोपनीयता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तक्रारीबाबत सरकारकडून कोणतंही पाऊल उचललं गेलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं असल्याचं वृत्त न्यूज इंटरनॅशनलनं दिलं आहे. 

पाकिस्तानी रेग्युलेशनने दिलेल्या माहितीनुसार, जर कोणताही पाकिस्तानी नागरिक सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून सरकार आणि कोणत्याही संस्थेला लक्ष्य करत असल्यास दोषी सिद्ध झाला तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच  पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना संशयाच्या आधारावर कोणत्याही नागरिकाचं अकाऊंट तपासण्याचीही सुविधा याद्वारे देण्यात आली आहे. जर कोणतीही माहिती सरकार किंवा संस्थेच्या विरोधात असेल तर सोशल मीडिया कंपन्यांना त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढावं लागणार आहे. 15 दिवसांमध्ये संबंधितावर कारवाई न केल्यास सरकार त्यांच्यावर 500 दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Breaking : सस्पेन्स सुटला, मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंग यांची नियुक्ती

...तर दिल्ली सरकारलाही देशद्रोहाचा कायदा समजला नाही : चिदंबरम

Delhi Voilence : दिल्ली हिंसाचारात 42 जणांचा मृत्यू, 630 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Delhi Violence: 'CAA च्या विरोधात नाही अन् समर्थनातही, तरीही फातिमाचं सर्वस्व जळालं'

आजच उरकून घ्या आर्थिक व्यवहार, मार्च महिन्यात 19 दिवस बँक बंद

 

English summary :
Facebook, Twitter, Google threaten to suspend services in Pakistan

Web Title: Facebook, Twitter, Google threaten to suspend services in Pakistan SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.