delhi violence 123 fir registered 630 people arrested or detained SSS | Delhi Voilence : दिल्ली हिंसाचारात 42 जणांचा मृत्यू, 630 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Delhi Voilence : दिल्ली हिंसाचारात 42 जणांचा मृत्यू, 630 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ठळक मुद्देईशान्य दिल्लीतील हिंसाचाराचा वणवा शमला असला तरी तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे.हिंसाचारात आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला असून 250 हून अधिक जण जखमी झाले.630 जणांना पोलिसांनी ताब्यात आणि काहींना अटक केली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराचा वणवा शमला असला तरी तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे. सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला असून 250 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दिल्ली हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 123 गुन्हे नोंद केले आहेत. तर 630 जणांना पोलिसांनी ताब्यात आणि काहींना अटक केली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी एमएस रांधवा यांनी दिली आहे. दिल्लीत शुक्रवारी अनुचित घटना घडली नाही. हिंसाग्रस्त भागातील स्थिती सुधारत असून जीवनावश्यक वस्तूही मिळत आहेत. तिथे 7 हजार सशस्त्र पोलीस व निमलष्करी जवान तैनात आहेत. घरे जळालेल्यांना 25 हजार रुपयांची मदत देणे सुरू आहे. या हिंसाचारात 500 हून अधिक वाहने जळाली, 52 दुकाने लुटण्यात आली. परिस्थितीत सुधारणा झाल्याने जमावबंदी शिथिल करण्यात आली होती.

पोलिसांनी हिंसाचाराबाबत उपलब्ध असलेले व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फूटेज तपासणीचे काम सुरू केले आहे. सीएए कायद्यावरुन दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा हिंसक वळण लागलं. सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीचे प्रकार घडले. या हिंसाचारात अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली. दिल्लीत उसळलेला हिंसाचार आणि दंगल रोखण्यात सरकारला आलेल्या अपयशावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतील दंगलीवरून बुधवारी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाने काँग्रेसकडून एक निवेदन राष्ट्रपतींना दिले. दिल्ली दंगलीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई व्हावी, तसेच दंगलीतील पीडितांना मदत देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनामधून राष्ट्रपतींकडे करण्यात आली. सीएए कायद्यावरुन दिल्लीतील मौजपूर, जाफराबाद भागात समर्थक आणि विरोधक भिडल्याने हिंसक आंदोलन पेटलं, जाळपोळ, दगडफेकीच्या घटनेने अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं. गाड्या जाळल्या, घरं जळाली, दुकानं लुटली, संपूर्ण बाजारपेठ जाळण्यात आली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काहींना घरं सोडावी लागली. या हिंसाचारात दगडफेक आणि जाळपोळ मोठ्या प्रमाणात झाली. आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Violence: 'CAA च्या विरोधात नाही अन् समर्थनातही, तरीही फातिमाचं सर्वस्व जळालं'

रुळ क्रॉसिंग करताना बसला रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 30 ठार

आजच उरकून घ्या आर्थिक व्यवहार, मार्च महिन्यात 19 दिवस बँक बंद

4 वर्षातून एकदा 'हॅप्पी बर्थ डे'... जाणून घ्या लीप वर्षाचं गणित

 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: delhi violence 123 fir registered 630 people arrested or detained SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.