4 वर्षातून एकदा 'हॅप्पी बर्थ डे'... जाणून घ्या लीप वर्षाचं गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 08:46 AM2020-02-29T08:46:37+5:302020-02-29T09:07:51+5:30

leap year came in every fourth year, 29 February is a leap year day. So, 29 frebruary cames in after every four year. So, celebration of 29 april is once in fourth

लीप वर्ष हे चार वर्षातून एकदा येते. म्हणूनच 29 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मदिवसही 4 वर्षांतून एकदाच येतो. त्यामुळे, 4 वर्षातून एकदा बर्थ डे सेलिब्रेशनची संधी मिळणाऱ्या मित्रांना तुम्हीही आज शुभेच्छा देऊ शकता.

सौर वर्ष हे अगदी 365 दिवसांचे नसते, ते 365.24219 दिवसांचा असते. म्हणजेच आपण वापरत असलेल्या 365 दिवसांच्या दिनदर्शिकेच्या दिवसापेक्षा सुमारे एक चतुर्थांश भाग जास्त आहे.

कालांतराने, त्यात आणखी भर पडत जाते व चार वर्षांनंतर जवळपास एक संपूर्ण दिवस जास्त होतो. दिनदर्शिकेचा एक प्राथमिक उपयोग म्हणजे लोकांना त्यांची पिके कधी लावायची हे जाणून घेण्यास मदत करणे होय.

तसेच इतरही अनेक उपयोग आहेत. या एक दिवस वाढणाऱ्या त्रुटीमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच आपल्याकडे 4 वर्षांनंतर लीप वर्ष येते व त्यात एक दिवस जास्त असतो.

पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास लागतात. पण आपलं वर्ष हे केवळ 365 दिवसांचेच असते. हे अतिरिक्त 6 तास भरून काढण्यासाठी दर चार वर्षांनी एक दिवस जादा जोडला जातो.

(6 तास गुणिले 4 म्हणजे 24 तासांचा एक पूर्ण दिवस) या प्रत्येक जोडलेल्या दिवसाला लीप दिवस आणि चार वर्षांनी येणाऱ्या त्या वर्षांला लीप वर्ष असे म्हणतात.

या हिशोबाने पुढील 2020 हे वर्षं लीप वर्ष असल्याने फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29 दिवस असतील. ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात 28 च्या ऐवजी 29 दिवस असतात. अश्या वर्षाला लीप वर्ष असे म्हणले जाते.

जर एखाद्या वर्षाच्या आकड्यातील शेवटच्या दोन आकड्यांची संख्या चारने पूर्णतः भागली गेली, तर ते वर्ष लीप वर्ष असते.

जर शेवटचे दोन आकडे 00 असे असतील तर ते वर्ष लीप वर्ष नसते.

विशेष म्हणजे 4 वर्षातून एकदाच हा जन्मदिन येत असल्याने तुम्ही मित्रांचा बर्थ डे धुमधडाक्यात साजरा करू शकता.