ठळक मुद्देशनिवार, रविवारसह होळीचा सण असल्याने सुट्टी म्हणून बँका 16 दिवस बंद असणार. 3 दिवस बँकेने संप पुकारला आहे. असे एकूण 19 दिवस बँकेचे कामकाज हे बंद.11 ते 13 मार्च दरम्यान संप असणार आहे.

नवी दिल्ली - बँक बंद असली की अनेकदा पैशांची चणचण भासू लागते. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागतं. इतक्या मोठ्या प्रमाणात भार पडल्याने एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण मार्च महिन्यात तब्बल 19 दिवस बँकेचे कामकाज बंद असणार आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार, रविवारसह होळीचा सण असल्याने सुट्टी म्हणून बँका 16 दिवस बंद असणार आहेत. तर 3 दिवस बँकेने संप पुकारला आहे. असे एकूण 19 दिवस बँकेचे कामकाज हे बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. 

मार्च महिन्यात केवळ 12 दिवस बँकेचे कामकाज चालणार असल्याने तुम्हाला बँकांची कामं लवकरच आटपावी लागणार आहे. या महिन्यात बँकेने संप देखील पुकारला आहे. जानेवारी, फेब्रुवारीनंतर आता मार्चमध्ये पगारवाढीसाठी त्यांनी संपाची हाक दिली आहे. 11 ते 13 मार्च दरम्यान संप असणार आहे. बँक कर्मचाऱ्यांनी 25 टक्के वेतनवाढीची मागणी केली आहे. मार्च महिन्यातील सुट्टींच्या यादीमध्ये दुसरा आणि चौथा शनिवारसह रविवारचा समावेश आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राज्यातील सार्वजनिक सुट्ट्याच्या या यादीत समावेश करण्यात आला आहे. 

Banks will remain closed for 11 days in October; See the list of holidays | ऑक्टोबर महिन्यात तब्बल 11 दिवस बँका राहणार बंद

मार्चमध्ये 'या' दिवशी बँका राहणार बंद 

1 मार्च - रविवार असल्याने बँका बंद असतील.

5 मार्च - ओडिशामध्ये पंचायती राज दिवस असल्याने बँका बंद असतील. (गुरुवार)     

6 मार्च - मिझोरममध्ये चपचर कुट सण असल्याने बँका बंद असतील. (शुक्रवार)

8 मार्च - रविवार असल्याने बँका बंद असतील.

9 मार्च -  उत्तर प्रदेशमध्ये हजरत अली यांचा जन्मदिवस असल्याने बँका बंद असतील. (सोमवार)

10 मार्च  - ओडिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसाममध्ये डोलजात्रा असल्याने बँका बंद असतील. (मंगळवार)

10 मार्च  - होळी असल्याने बँका बंद असतील. (मंगळवार)

14 मार्च  - मार्च महिन्यातील दूसरा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहे.

15 मार्च  - रविवार असल्याने बँका बंद असतील.

union cabinet likely to do merger of 10 psu banks into four big lenders bank mergers | 1 एप्रिलला होऊ शकते 10 बँकांचं विलीनीकरण; खाते आणि पैशांवर असा पडणार प्रभाव?

22 मार्च - रविवार असल्याने बँका बंद असतील.

23 मार्च - हरियाणामध्ये भगतसिंग शहीद दिवस असल्याने बँका बंद असतील. (सोमवार)

25 मार्च  - कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्‍ट्र, मणिपूर आणि जम्‍मू-कश्‍मीर (बुधवार)    

26 मार्च - गुजरात, राजस्‍थान, मध्‍य प्रदेश आणि उत्‍तराखंडमध्ये चेटी चंद जयंती असल्याने बँका बंद राहणार आहे. (गुरुवार)

27 मार्च  - झारखंडमध्ये सरहुल असल्याने बँका बंद असतील. (शुक्रवार)

28 मार्च - मार्च महिन्यातील चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहे.    

29 मार्च  - रविवार असल्याने बँका बंद असतील.

Banks will remain closed for three consecutive days, Indian Bank Association calls for strike | Bank Strike : सलग तीन दिवस बँका राहणार बंद, इंडियन बँक असोसिएशनने दिली संपाची हाक

महत्त्वाच्या बातम्या 

रुळ क्रॉसिंग करताना बसला रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 30 ठार

Delhi Violence: दिल्ली पूर्वपदावर, मृतांची संख्या ४२

4 वर्षातून एकदा 'हॅप्पी बर्थ डे'... जाणून घ्या लीप वर्षाचं गणित

दिल्लीतील दंगल घडली की घडवली...?

 

English summary :
Bank holidays in March 2020: ALERT! 19 days of no work! Account holders should rush to get work done

Web Title: Bank holidays in March 19 days of no work! Account holders should rush to get work done SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.