शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत प्रश्नांत बाह्य हस्तक्षेप मान्य नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 04:22 IST

मोदींनी नाव न घेता पाकिस्तानला फटकारले; पुतीन यांची गळाभेट

व्लादिवोस्तोक (रशिया) : देशाच्या अंतर्गत प्रश्नांत बाह्य शक्तींचा हस्तक्षेप आम्हा दोन्ही राष्ट्रांना मान्य नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संयुक्त पत्रकार परिषदेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या साक्षीने सांगत पाकिस्तानला फटकारले. दरम्यान, या दोन नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, तेल व गॅस, अणुऊर्जा, संरक्षण आणि समुद्री संपर्क यात सहकार्य करण्यावर चर्चा केली.

काश्मिरातील कलम ३७० हटविल्यानंतर भारत- पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे. भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला स्पष्टपणे सांगितले आहे की, कलम ३७० च्या बहुतांश तरतूदी समाप्त करणे हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. तथापि, रशियाने काश्मिर मुद्यावर भारताच्या निर्णयाचे समर्थन केलेले आहे आणि सांगितले की, काश्मिरच्या दर्जातील परिवर्तन भारतीय राज्यघटनेला अनुसरुनच आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यासोबत ज्वेज्दा जहाज बांधणी कॉम्प्लेक्सचा दौरा केला आणि येथील व्यवस्थापन आणि अन्य कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. पुतीन यांनी मोदी यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. दोन दिवसांच्या रशिया दौºयावर असलेल्या मोदी यांनी राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा केली. रशियाच्या पूर्व भागात दौरा करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. ज्वेज्दा जहाज बांधणी कॉम्प्लेक्स येथे जाण्यापूर्वी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली.जहाज बांधणी कॉम्प्लेक्सचा दौरा केल्यानंतर मोदी म्हणाले की, जहाज बांधणी क्षेत्रात रशिया-भारताचे संबंध मजबूत होत आहेत. विजय दिवस समारंभाचे मोदींना निमंत्रण‘द ग्रेट पेट्रिओटिक वॉर’मधील विजयाच्या ७५ व्या वर्षानिमित्त आयोजित २०२० मधील मॉस्कोतील समारंभासाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. ब्रिक्स संमेलनात मोदी यांच्याशी भेटण्याची योजना असल्याचे पुतीन यांनी यावेळी सांगितले. रशियातील पूर्व भागातील बंदराचे शहर व्लादिवोस्तोकमध्ये ‘ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम’मध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांनी मोदी यांचे आभार मानले. व्यापार, गुंतवणूक, औद्योगिक क्षेत्र, सैन्य आणि तंत्रज्ञान संबंध, शिक्षण व संस्कृतीसह द्विपक्षीय संबंधांबाबत सहमती झाली, असे पुतीन यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर