कैद्यांच्या गळ्यात स्फोटके बांधून उडविले

By Admin | Updated: June 25, 2015 00:02 IST2015-06-25T00:02:43+5:302015-06-25T00:02:43+5:30

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया अर्थात इसिसच्या क्रौर्याच्या कथा सांगाव्यात तितक्या कमी अशी स्थिती झाली आहे.

The explosives were tied up in the prisoners' chest | कैद्यांच्या गळ्यात स्फोटके बांधून उडविले

कैद्यांच्या गळ्यात स्फोटके बांधून उडविले

मोसुल : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया अर्थात इसिसच्या क्रौर्याच्या कथा सांगाव्यात तितक्या कमी अशी स्थिती झाली आहे. केवळ ऐतिहासिक इमारती नष्ट करण्यावर त्यांचे समधान होत नसून, ताब्यात असलेल्या कैद्यांच्या हत्या अत्यंत क्रूरपणे केल्या जात आहेत.
इराकमधील मोसुल शहरातील एक चित्रफीत इसिसने प्रसिद्ध केली असून, त्यात सात कैद्यांना एका रांगेत बसवून त्यांच्या गळ्यात स्फोटके बांधून उडविण्यात आल्याचे दिसत आहे. या कैद्यांचे तीन गट करण्यात आले असून दुसऱ्या गटाला पाण्यात बुडवून ठार मारण्यात आले, तर तिसऱ्या गटाला कारमध्ये बसवून कार लॉक केली व ती रॉकेट लाँचरने उडवून देण्यात आली असून कारमध्ये बसलेले सर्व कैदी मरण पावले आहेत.

Web Title: The explosives were tied up in the prisoners' chest