शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 13:39 IST

गाझा येथील इस्रायली हल्ल्यामुळे आधीच अनेक मुस्लीम देश नाराज आहेत. त्यातच दोहा इथल्या हल्ल्यानं आणखी वातावरण चिघळले आहे.

कतारची राजधानी दोहा येथे एक मोठे संमेलन होत आहे. अरब इस्लामिक शिखर संमेलनात ५० हून अधिक मुस्लीम देश सहभागी होणार आहेत. दोहा येथे इस्रायली हल्ल्यानंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा इतक्या मोठ्या संख्येने मुस्लीम देश एकवटणार आहेत. त्यामुळे या संमेलनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हे संमेलन ना केवळ इस्रायल, तर अमेरिकेचीही चिंता वाढवणारे आहे. 

गाझा येथील इस्रायली हल्ल्यामुळे आधीच अनेक मुस्लीम देश नाराज आहेत. त्यातच दोहा इथल्या हल्ल्यानं आणखी वातावरण चिघळले आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानचे नाव घेऊन इस्रायलने संतप्त भूमिका व्यक्त केली, त्यामुळे इतर देशांनीही धडकी घेतली आहे. इस्रायली हल्ल्याने अमेरिकेचे समर्थन करणाऱ्या अरब देशांच्या एकजुटीलाही बाधा निर्माण झाली आहे. हे आपत्कालीन शिखर संमेलन अरब लीग आणि इस्लामिक सहयोग संघटनेच्या सदस्यांना एकाच व्यासपीठावर आणणारे आहे. कतार एकटा नाही, अरब आणि इस्लामी देश त्याच्यासोबत उभे आहे असा संदेश अरब लीगचे महासचिव अहमद अबुल गैन यांनी एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत दिले. 

नेतन्याहू यांचा दबाव कायम

९ सप्टेंबरच्या हल्ल्याचा निषेधाला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कतारवर हमास नेत्यांच्या हजेरीवरून दबाव वाढवला आहे. हमासच्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, अन्यथा त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवा असा इशारा त्यांनी कतारला दिला आहे. कतार जवळपास २ वर्ष गाझा युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र हल्ल्यानंतर कतारने इस्रायलवर आरोप केला आहे. इस्रायल शांतता प्रस्थापित करण्याला बाधा आणत असून नेतन्याहू हिंसाचार पसरवत आहेत असा आरोप कतारने केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प नाराज

दरम्यान, कतारवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाराज झाले आहेत. कतारला जवळचा मित्र म्हणत तो शांततेसाठी प्रयत्न करत होता असं ट्रम्प यांनी म्हटलं. या हल्ल्यानंतर कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांनी त्यांच्या भूमीवर पुन्हा अशी घटना घडायला नको असं म्हटलं आहे. तर कतारने त्यांच्या इथून हमासचे नेते हटवायला हवेत अशी मागणी इस्रायलने केली आहे.

टॅग्स :Israelइस्रायलQatarकतारAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प