शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प सरकारसाठी धोक्याची घंटा; इलॉन मस्क ठरणार भस्मासुर ? सर्वेक्षणातून धक्कादायक दावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 20:35 IST

Elon Musk Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर इलॉन मस्कचा मोठा प्रभाव असल्याचे म्हटले जात आहे.

Elon Musk Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. त्यांच्या निर्णयांचा संपूर्ण जगावर परिणाम जाणवतोय. विशेष म्हणजे, ट्रम्प यांची सत्ता आणण्यात उद्योगपती इलॉन मस्क यांचा मोठा वाटा आहे. जो बायडेन यांना सत्तेवरुन हटवण्यासाठी मस्क यांनीच डोनाल्ड ट्रम्प यांना आर्थिक मदत पुरवली होती. मस्क आणि ट्रम्प यांच्या मैत्रीची जगभर चर्चा सुरू आहे. पण, आता हीच मैत्री धोक्याची घंटा बनू शकते, असे एका अहवालात म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर इलॉन मस्क यांच्यावर व्हाईट हाऊसची मोठी जबाबदारीही सोपवली आहे. मस्क यांच्याकडे शासकीय कार्यक्षमता विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी मिळताच मस्क मोठमोठे निर्णय घेत आहेत. पण एका सर्वेक्षणाने ट्रम्प यांचे टेन्शन वाढवले ​​आहे. इलॉन मस्क, ट्रम्पसाठी 'भस्मासुर' बनू शकतात, असे सीएनएनच्या सर्वेक्षणात म्हटले आहे.

सीएनएनचे सर्वेक्षणइलॉन मस्क, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कामात हस्तक्षेप करतात, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 54 टक्के अमेरिकन नागरिकांचे म्हणणे आहे. मस्क कर्मचाऱ्यांची स्वत:च्या गरजेनुसार वर्गवारी करत आहे, ज्याचा भविष्यात परिणाम होऊ शकतो. बहुतांश लोकांचा असा विश्वास आहे की, ट्रम्प प्रशासनाच्या खर्चावर मस्कचा प्रभाव आहे. 42 टक्के लोकांनी सांगितले की, ट्रम्प जे करत आहेत, ते चुकीचे आहे आणि त्याचा अमेरिकेला कोणत्याही प्रकारे फायदा होणार नाही.

ट्रम्प मस्कचे पंख कापणार?इकडे ट्रम्प यांनाही याची जाणीव झाली आहे. ते सतत मस्कचे पंख कापण्यात व्यस्त आहेत. नुकतेच ट्रम्प यांनी मस्कचा आदेश हा अंतिम आदेश नसल्याचे म्हटले आहे. यापूर्वी त्यांनी मस्क यांना सूट दिली होती. इतकेच नाही, तर याआधी मस्क देखील टी-शर्ट घालून व्हाईट हाऊसमध्ये जात होते, मात्र आता त्यांनी आपला ड्रेस कोड बदलला आहे. मस्क आता कोट घालून व्हाईट हाऊसला जाणार आहेत. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्कAmericaअमेरिका