शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

इबोलाचा जगात हाहाकार; अमेरिकेत दहशत

By admin | Updated: October 17, 2014 23:54 IST

इबोला या घातक आजाराने जगात हाहाकार माजवला असून चार हजाराहून अधिक बळी घेतले आहेत.

वॉशिंग्टन : इबोला या घातक आजाराने जगात हाहाकार माजवला असून चार हजाराहून अधिक बळी घेतले आहेत. कोणतीही लस अथवा औषध उपलब्ध नसल्याने या विषाणूची सध्या प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. इबोलाचा संसर्ग झालेल्या टेक्सासमधील परिचारिकेला पुढील उपचारासाठी गुरुवारी वॉशिंग्टनजवळील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ (एनआयएच) येथे हलविण्यात आले आहे. देशाची सर्वोच्च वैद्यकीय सुविधा म्हणून एनआयएचकडे पाहिले जाते. टेक्सासमध्ये इबोला रुग्णावर उपचार करताना निना फाम (26) हिला संसर्ग झाला होता. निनावर एनआयएचमध्ये अत्याधुनिक उपचार करण्यात येतील, असे नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर अलर्जी अॅण्ड इन्फेक्शिअस डिसिजचे प्रमुख अॅन्थोनी फौसी यांनी सांगितले. टेक्सास प्रेस्बायटेरियन हॉस्पिटल डलासमध्ये कार्यरत निना लायबेरियन इबोला रुग्ण थॉमस एरिक डन्कन याच्यावर उपचार करणा:या वैद्यकीय पथकात सहभागी होती. डन्कन यांचा आठ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनी निना यांना इबोलाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. तेव्हापासून त्यांच्यावर संसर्गरोधी कक्षात उपचार सुरू आहेत. निना यांच्यापाठोपाठ त्यांच्या सहकारी अॅम्बर व्हिन्सन यांनाही इबोलाची बाधा झाल्याचे गेल्या बुधवारी आढळून आले. 
अॅम्बर यांच्यावर अटलांटा येथील इमोरी युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डन्कन यांच्यावर उपचार केलेल्या रुग्णालयातील 7क् आरोग्य कर्मचा:यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. यापैकी कोणतीही इबोलाची लक्षणो आढळून आल्यास त्याला तातडीने संसर्गरोधी कक्षात हलविण्यात येणार आहे. अमेरिकी प्रशासनाने आणखी काही रुग्ण पुढे येऊ शकतात, असा इशारा दिला  आहे. (वृत्तसंस्था)