शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या वाढली, २०२३-२४ च्या आर्थिक सर्वेक्षणातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 06:45 IST

Donkey Population Increases in Pakistan: २०२३-२४ या वर्षात पाकिस्तानमध्ये गाढवांच्या संख्येत १.७२ टक्क्यांनी वाढ होऊन ती ५९ लाखांवर पोहोचली आहे. त्या देशाच्या २०२३-२४ च्या आर्थिक सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात पाकिस्तानातील पशुधनाचा आढावा घेण्यात आला आहे.

 इस्लामाबाद - २०२३-२४ या वर्षात पाकिस्तानमध्ये गाढवांच्या संख्येत १.७२ टक्क्यांनी वाढ होऊन ती ५९ लाखांवर पोहोचली आहे. त्या देशाच्या २०२३-२४ च्या आर्थिक सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात पाकिस्तानातील पशुधनाचा आढावा घेण्यात आला आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या पीएमएल (एन) नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या पीपीपीने सरकारवर वार्षिक अर्थसंकल्प तयार करताना त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा  आरोप केला आहे. या वादामुळे पाकिस्तानच्या सत्ताधारी आघाडी सरकारच्या मित्रपक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले असल्याचे समोर आले आहे. (वृत्तसंस्था)

५.७५ कोटी गुरेढोरे, ४.६३ कोटी म्हशीपाकिस्तानच्या ग्रामीण भागांमध्ये राहाणारे सामान वाहून नेण्यासाठी गाढवाचा उपयोग करतात. तेथील गाढव, घोडे, खेचर हे पशू त्या देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक आहेत. त्या देशाचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी पशुधनाबाबत आणखी माहिती आर्थिक सर्वेक्षणात दिली आहे. पाकिस्तानात ५.७५ कोटी गुरेढोरे, ४.६३ कोटी म्हशी, ३.२७ कोटी मेंढ्या, ८.७ कोटी बकऱ्या व बकरे आहेत. गेल्या आर्थिक वर्षात उंटांची संख्या ११ लाखांवरून १२ लाखांपर्यंत पोहोचली आहे. 

८० लाख कुटुंबांचे संसार... nगाढव, उंट, घोडे, खेचर, गुरेढोरे, म्हशी, मेंढ्या, बकरी-बकरे हे प्राणी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. या पशुधनाचे संवर्धन व त्यांच्याकडून करून घेण्यात येणारी कामे यातून आर्थिक उलाढालींवर सुमारे ८० लाख कुटुंबांचे संसार चालतात. nयेथील पशुधनाचे एकूण मूल्य २०२२-२३ मध्ये ५५८७ अब्ज रुपये होते. ते २०२३-२४ मध्ये ५८०७ अब्ज रुपयांवर पोहोचले आहे.  

इम्रान खान सरकारशी चर्चा करणारआपल्या जुन्या भूमिकेतून माघार घेत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकीय तणाव कमी करण्यासाठी सरकारशी चर्चेला हिरवा कंदील दिला. यापूर्वी त्यांनी सरकारशी चर्चा करण्यास नकार दिला होता. पीटीआयने सरकारशी चर्चा सुरू करावी, असे कोर्टाने म्हटल्यानंतर इम्रान यांचे मत बदलले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय