शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:13 IST

Trump On Jeffrey Epstein Files: अमेरिकन न्याय विभागाने शुक्रवारी या फाइल्स जारी करायला सुरवात केली आहे...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एपस्टीन फाइल्ससंदर्भात भोष्य केले आहे. जे निर्दोष कोल जेफरी एपस्टीनला भेटले, त्यांची प्रतिष्ठाही लैंगिक गुन्हेगारांशी संबंधित चौकशी फाइल्स जारी झाल्याने मलीन होण्याची शक्यता आहे. तसेच हा मुद्दा आपल्या पक्षाच्या कामगिरीवरून लक्ष विचलित करणारा असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकन न्याय विभागाने शुक्रवारी या फाइल्स जारी करायला सुरवात केली आहे. माझेही फोटो आहेत, सर्वांचेच... -पत्रकारांसोबत बोलतान डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'एपस्टीनशी संबंधित हे संपूर्ण प्रकर रिपब्लिकन पक्षाच्या जबरदस्त यशावरून जनतेचे लक्ष हटवण्याची एक पद्धत आहे. न्याय विभागाने जारी केलेल्या एपस्टीन प्रकरणाशी संबंधित फोटोंच्या पहिल्या बॅचमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनही दिसत आहेत. यासंदर्भात ट्रम्प यांना विचारणा केली असता ट्रम्प म्हणाले, "बिल क्लिंटन आपले आवडते नेते आहेत. माझे त्यांच्यासोबत नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. त्यांचे फोटो अशा पद्धतीने बाहेर येताना पाहून वाईट वाटते. माझेही फोटो आहेत. या माणसाशी (एपस्टाईन) सर्वांचेच मैत्रीचे संबंध होते. बिल क्लिंटन एक मोठे व्यक्ती आहेत."

प्रतिष्टित बँकर्स, वकील आणि इतर काही लोकांचाही समावेश -पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले, कदाचित आपल्याकडे इतरही अनेक लोकांचे फोटो असतील, जे काही वर्षांपूर्वी, जेफ्री एपस्टाईनला निष्पापपणे भेटले होते, यात प्रतिष्टित बँकर्स, वकील आणि इतर काही लोकांचाही समावेश आहे. एपस्टाईनशी काहीही संबंध नसलेल्या लोकांचे फोटोही प्रसिद्ध होत असल्याने, मोठ्या प्रमाणावर लोक नाराज आहेत."

श्रीमंत फायनान्सर एपस्टीनचा 2019 मध्ये न्यूयॉर्क येथील कारागृहात लैंगिक तस्करीच्या आरोपांवरील खटल्याची प्रतिक्षा करतानाच मृत्यू झाला. ज्याला आत्महत्या म्हणून घोषित करण्यात आले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump on Epstein files: 'My photos too,' defends Clinton.

Web Summary : Trump addresses Epstein files, noting their potential to tarnish reputations of those who innocently met Epstein. He acknowledged photos of himself and defended Bill Clinton, emphasizing their past good relationship. Trump suggests the issue distracts from Republican successes.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिका