शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एक नाही, तर तीन बंदुकांमधून गोळीबार; मोठी माहिती उघड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 18:11 IST

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे.

Donald Trump Firing : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प यांच्यावर एक नाही, तर तीन बंदुकीतून गोळीबार करण्यात आला आहे. म्हणजेच, घटनास्थळी एक नाही, तर तीन शूटर उपस्थित होते. या घटनेच्या ऑडिओ फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये दावा करण्यात येतोय की, ट्रम्प यांच्यावर तीन बंदुकांमधून गोळीबार करण्यात आला आहे. एका बंदुकीतून तीन, तर दुसऱ्या बंदुकीतून पाच गोळ्या झाडण्यात आल्या. तिसऱ्या बंदुकीतून सुटलेली गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला लागली.

गुप्तहेर खात्याने दुर्लक्ष केलेडोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याची चौकशी करण्यासाठी संसदीय समिती नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात मिसुरीच्या सिनेटरने संसदीय समितीला पत्र लिहिले आहे. या हल्ल्याचा तपास जनतेसमोर व्हावा, असे त्यात म्हटले आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी पोलिस हल्लेखोरापर्यंत गेल्याचेही समोर आले आहे. हल्लेखोराने पोलिसांकडे बंदूक रोखली होती, त्यामुळे पोलिसांची मागे हटावे लागले. 

यानंतर पोलिसांनी तात्काळ या घटनेची माहिती गुप्तहेर खात्याला दिली. त्यांनी कारवाई करेपर्यंत हल्लेखोर थॉमस मॅथ्यूने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला होता. हल्लेखोराबाबत वारंवार अलर्ट मिळूनही गुप्तहेर खात्याने त्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे गुप्तचर यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांनी वेळीच कारवाई केली असती, तर ट्रम्प यांच्यावर गोळी झाडली नसती आणि इतर दोन लोकांचा मृत्यू झाला नसता. 

त्या दिवशी नेमके काय घडले?डोनाल्ड ट्रम्प शनिवारी पेनसिल्व्हेनियातील एका रॅलीला संबोधित करत होते. यावेळी अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला. एक गोळी त्यांच्या कानाला लागली, तर इतर गोळ्या त्यांच्या दोन समर्थकांना लागल्या. या घटनेत ट्रम्प थोडक्यात बचावले, पण दोन समर्थकांचा मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या थॉमस मॅथ्यू क्रुक्स (20) यालाही सुरक्षा रक्षकांनी तात्काळ ठार केले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पFiringगोळीबारAmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय