शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 21:23 IST

‘ब्लड पॅक्ट’ नावाचा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म, खामेनेई यांचा अपमान करणाऱ्या आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात 'बदला' घेण्यासाठी फंड जमा करत असतानाच, लारीजानी यांचे हे विधान आले आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांचे वरिष्ठ सल्लागार जवाद लारीजानी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. "जेव्हा ट्रम्प त्यांच्या मार-ए-लागो या आलिशान घरात उन्ह घेत असतील, तेव्हा त्यांना गोळी लागू शकते," असे लारीजानी यांनी म्हटले आहे.

इराणमधील एका इंटरनॅशनल वेबसाइटनुसार, ते म्हणाले, "ते (डोनाल्ड ट्रम्प) जेव्हा पोटावर उन्हात झोपलेले असतील, तेव्हा एक छोटेसे ड्रोन त्यांच्यावर हल्ला करू शकते. हे फारच सोपे आहे." महत्वाचे म्हणजे, लारीजानी हे अयातुल्ला खामेनेई यांचे अत्यंत जवळचे माणले जातात.

‘ब्लड पॅक्ट’ वेबसाइट जमाकरतेय निधी - ‘ब्लड पॅक्ट’ नावाचा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म, खामेनेई यांचा अपमान करणाऱ्या आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात 'बदला' घेण्यासाठी फंड जमा करत असतानाच, लारीजानी यांचे हे विधान आले आहे. वेबसाइटने दावा केला आहे की, आतापर्यंत त्यांनी 27 मिलियन डॉलरहून अधिक रक्कम जमा केली आहे. त्यांचे लक्ष्य 100 मिलियन डॉलरचे आहे. संबंधित वेबसाइटवर प्रकाशित एका निवेदनात म्हणण्यात आले आहे की, 'जे अल्लाहते शत्रू आणि खामेनेई यांचा जीव धोक्यात टाकणाऱ्यांचा न्याय करतील, त्यांना बक्षीस दिले जाईल."

पश्चात्य दुतावासांबाहेर निदर्शन करण्याचे आवाहन -इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सशी संबंधित फार्स न्यूज एजन्सीने या मोहीमेच्या सुरुवातीची पुष्टी केली आहे. तसेच, धार्मिक समूहांना पश्चात्य देशांचे दुतावास आणि शहरांच्या केंद्र स्थानी निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर, ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात 'मोहेरेबेह' सारखा इस्लामी कायदा लागू करण्यात यावा. इराणी कायद्यात ‘मोहेरेबेह’ अर्थात ‘अल्लाहविरोधात युद्ध’ एक गंभीर गुन्हा असून याची शिक्षा मृत्यू आहे.

इराणचे नवे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान, अमेरिकन पत्रकार टकर कार्लसनसोबत बोलताना म्हणाले, हा ‘फतवा’ ना सरकारचा आहे, ना खामेनेई यांचा. मात्र, खामेनेई यांच्या आधीन असलेल्या, ‘कायहान’ वृत्तपत्राने हे विधान फेटाळत, 'हे शैक्षणिक मत नाही, तर धर्माचे रक्षण करण्यासाठी धार्मिक आदेश आह. भविष्यात कुणी अशी आग लावण्याचा प्रयत्न केला तर, याचा परिणाम अत्यंत घातक होईल. इस्लामिक रिपब्लिक इस्रायलला रक्तात बुडवू," असे लिहिले आहे.0 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणAmericaअमेरिका