शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 10:00 IST

Delhi Car Blast: कारमध्ये डॉ. उमरच होता याची पुष्टी DNA टेस्टमुळे झाली आहे

Delhi Car Blast: दिल्ली बॉम्बस्फोटानंतर असंख्य तपशील समोर आले आहेत. मृतांचा आकडा देखील जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, या घटनेत दहशतवादी डॉ. उमरसह १२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. उमरच्या कुटुंबाला आधीच याचा संशय होता की तो कट्टरपंथी बनला आहे. पण त्यांनी सुरक्षा एजन्सींना या प्रकरणाची कोणतीही माहिती दिली नाही. दहशतवादी डॉ. उमर हा सेशन्स अँपद्वारे तुर्कीच्या अंकारा येथील त्याच्या हँडलर 'उकासा' (संभाव्य कोडनेम) शी सतत संपर्कात होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक मार्च २०२२ मध्ये भारतातून अंकाराला गेले होते. या व्यक्तींमध्ये उमर आणि फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलमध्ये अटक केलेल्या इतर संशयितांचा समावेश असल्याचा संशय आहे. अंकारा येथील त्यांच्या भेटीदरम्यान त्यांचे ब्रेनवॉशिंग करण्यात आले. राष्ट्रीय तपास संस्था याची पडताळणी करण्यासाठी नवी दिल्लीतील तुर्की दूतावासाशी संपर्क साधत आहे आणि सहकार्य मागितले जात आहे.

दरम्यान, दहशतवादी उमरच्या मार्गाबाबत अधिक माहिती समोर आली आहे. त्यानुसार उमर फरिदाबादहून पळून गेला आणि मेवातमार्गे फिरोजपूर झिरका येथे पोहोचला. तिथून तो दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे ने दिल्लीला परतत होता. त्याने दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवरील एका ढाब्यावर रात्र काढली. त्या रात्रीही तो त्याच्या गाडीत झोपला. त्यानंतर तो दिल्ली-मुंबई महामार्गावरील मुरादाबाद मार्गे परतला आणि बदरपूर सीमेवरून दिल्लीत प्रवेश केला. आरोपी उमर हा दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

पोलिसांकडे डॉ. उमरचे सुमारे ५० ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज आहे. यावरून असे दिसून येते की डॉ. उमरने फरिदाबादहून दिल्लीत प्रवेश केल्यापासून दिल्लीच्या अनेक भागातून प्रवास केला होता. दिल्ली पोलिसांच्या मॅपिंगनुसार, दुपारी ३ वाजेपूर्वी त्याने दिल्लीच्या अनेक भागातून कार चालवली होती. दिल्ली पोलिसांच्या जिल्हा रेकॉर्डनुसार, त्यांना पहिल्यांदा फरिदाबादपासून काही अंतरावर पाहिले गेले. त्यानुसार, पोलिसांनी सीसीटीव्ही तपास केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Car Blast Mastermind: Who Was Dr. Umar Taking Orders From?

Web Summary : Delhi blast mastermind Dr. Umar, linked to 'Ukasa' in Turkey, traveled from Faridabad to Delhi via multiple routes. NIA seeks Turkey's help. CCTV footage reveals his movements before the blast, showing extensive travel within Delhi.
टॅग्स :delhiदिल्लीRed Fortलाल किल्लाBlastस्फोटcarकार