तेहरान : इराणची राजधानी तेहरानजवळील एका शॉपिंग सेंटरमध्ये लागलेल्या भीषण आगीत आठ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ४० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती आपत्कालीन सेवा विभागाने बुधवारी दिली.
ही आग मंगळवारी तेहरान प्रांतातील अंदीशेह शहरातील अर्घावन शॉपिंग सेंटरमध्ये लागली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. इराणच्या सरकारी दूरचित्रवाहिनीने (आयआरआयबी) सांगितले की, या घटनेचा तपास सुरू आहे.
अमेरिकेबरोबर युद्धविराम सुरू असतानाची घटना
दूरचित्रवाहिनीवरील दृश्यांमध्ये अग्निशमन दलाचे जवान बहुमजली इमारतीतील आगीवर नियंत्रण मिळवताना दिसत होते.
इमारतीतून मोठ्या प्रमाणात काळ्या धुराचे लोट येताना दिसत होते. दरम्यान, ही आग अमेरिकेसोबत सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित असल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. दोन्ही देशांत ३ आठवड्यांपासून युद्धविराम लागू आहे.
Web Summary : A massive fire at a shopping center near Tehran, Iran, has killed eight people and injured around 40. The fire broke out Tuesday at the Arghavan Shopping Center in Andisheh city. The cause is under investigation; no link to the US conflict is indicated.
Web Summary : ईरान की राजधानी तेहरान के पास एक शॉपिंग सेंटर में भीषण आग लगने से आठ लोगों की मौत हो गई और लगभग 40 घायल हो गए। आग मंगलवार को अंदीशेह शहर के अर्घावन शॉपिंग सेंटर में लगी। कारण की जांच जारी है; अमेरिका के साथ संघर्ष से कोई संबंध नहीं है।