वाघा हल्ल्याच्या सूत्रधाराचा खात्मा

By Admin | Updated: January 11, 2015 00:26 IST2015-01-11T00:26:54+5:302015-01-11T00:26:54+5:30

वाघा सीमा आत्मघाती बॉम्बहल्ल्याच्या सूत्रधाराचा येथील चकमकीत आपण खात्मा केल्याचा दावा पाकिस्तानी पोलिसांनी केला आहे.

The death of the leader of the Wagah assailant | वाघा हल्ल्याच्या सूत्रधाराचा खात्मा

वाघा हल्ल्याच्या सूत्रधाराचा खात्मा

लाहोर : वाघा सीमा आत्मघाती बॉम्बहल्ल्याच्या सूत्रधाराचा येथील चकमकीत आपण खात्मा केल्याचा दावा पाकिस्तानी पोलिसांनी केला आहे. गेल्या वर्षी वाघा सीमेवर झालेल्या या हल्ल्यामध्ये ६१ जण ठार झाले होते.
तेहरीक ए तालिबान पाकिस्तानचा लाहोरप्रमुख रुहुल्ला ऊर्फ असदुल्ला व त्याच्या दोन साथीदारांना येथील बुर्की रोड भागात पोलिसांनी चकमकीत ठार मारले. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बुर्की रोडवरील एका घरावर धाड टाकण्यात आली. पोलीस घराजवळ जाताच असदुल्ला व त्याच्या साथीदारांनी गोळीबार सुरू केला. त्यामुळे पोलिसांना प्रत्युत्तर द्यावे लागले. सुमारे अर्धा तास चकमक सुरू होती. चकमकीदरम्यान स्फोटांचेही अनेक आवाज ऐकू आले. गोळीबार थांबल्यानंतर पोलिसांनी घरात जाऊन तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. हे तिघेही बाजौरच्या आदिवासी भागातील रहिवासी आहेत. या घरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटके, आत्मघाती हल्लेखोरांकडून परिधान करण्यात येणारे कपडे, डेटोनेटर, दहशतवादी साहित्य आणि अन्य उपकरणे आढळून आली. (वृत्तसंस्था)

Web Title: The death of the leader of the Wagah assailant