पोलीस मुख्यालयावर डलासमध्ये हल्ला

By Admin | Updated: June 14, 2015 02:23 IST2015-06-14T02:23:06+5:302015-06-14T02:23:06+5:30

अमेरिकेतील डलास येथील पोलीस मुख्यालयावर शनिवारी पहाटे चार हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यानंतर बंदूकधारी हल्लेखोर चिलखती वाहनातून पसार झाले.

Dallas attack on police headquarters | पोलीस मुख्यालयावर डलासमध्ये हल्ला

पोलीस मुख्यालयावर डलासमध्ये हल्ला

टेक्सास : अमेरिकेतील डलास येथील पोलीस मुख्यालयावर शनिवारी पहाटे चार हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यानंतर बंदूकधारी हल्लेखोर चिलखती वाहनातून पसार झाले. सुदैवाने हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. या हल्ल्यामागचा हल्लेखोरांचा हेतू कळला नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलीस मुख्यालयाबाहेर अनेक बॅग्ज आढळून आल्या असून यापैकी एका बॅगमध्ये पाईपबॉम्बसह इतर स्फोटके होती.
आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेनुसार शनिवारी ५.३० वाजता हा गोळीबार झाला. हल्लेखोर चौघे जण असल्याचे डलास पोलीस प्रमुख डेव्हिड ब्राऊन यांनी एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने सांगितले.
पोलीस वाहनाला धडक देत एक संशयित चिखलती व्हॅनमधून पसार झाला. खबरदारी म्हणून पोलीस मुख्यालयाच्या आसपासचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. पोलिसांनी या व्हॅनचा पाठलाग करीत गोळीबार केला. (वृत्तसंस्था)

Web Title: Dallas attack on police headquarters