शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

CoronaVirus News : "कोरोनावर लस विकसित झाली तरी..."; बिल गेट्स यांचं चिंताजनक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 10:02 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात आहे. या संकटाचा सर्वोतोपरी सामना केला जात आहे. अनेक देशांमध्ये कोरोनावरील औषध आणि लस शोधण्यासाठी दिवसरात्र काम केले जात आहे.

वॉशिंग्टन - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 99 लाखांवर गेली आहे. तर आतापर्यंत 4 लाख 96 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. जगभरात यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिल गेट्स यांनी कोरोनावरील लसीबाबत एक चिंताजनक वक्तव्य केलं आहे. 

कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात आहे. या संकटाचा सर्वोतोपरी सामना केला जात आहे. अनेक देशांमध्ये कोरोनावरील औषध आणि लस शोधण्यासाठी दिवसरात्र काम केले जात आहे. काही कंपन्यांच्या लस चाचणीच्या अंतिम टप्प्यावर आल्या आहे. मात्र लस विकसित झाली तरी कोरोनाची लागण होणारच नाही, याची खात्री देता येणार नसल्याचं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतील सीएनएन या वृत्तवाहिनीसोबत बोलताना बिल गेट्स यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जगभरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर त्यांनी चिंता व्यक्त केली. 

बिल गेट्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाखेर अथवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाची लस उपलब्ध होईल. या लसीचे दोन फायदे होणार आहेत. एक तर कोरोनाच्या आजारापासून बचाव करेल आणि दुसरं म्हणजे कोरोनाचा संसर्ग रोखला जाणार आहे. मात्र, लसीमुळे तुम्हाला कोरोनाची लागण होणारच नाही अशी खात्री देता येणार नाही. तसेच सध्या कोरोना प्रतिबंधक लसीची आवश्यकता आहे. अशावेळी वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्ती, गरोदर महिलांवर चाचणी करण्यासाठी वेळ नाही. अशा परिस्थितीत योग्य, अचूक माहिती संकलित करणे हे कठीण काम असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

अमेरिकेतील परिस्थितीबाबतही बिल गेट्स यानी चिंता व्यक्त केली. अमेरिकेत कोरोनाच्या चाचण्या अधिक होत असल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचा व्हाइट हाऊसचा दावा अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत एकाच दिवसात सर्वाधिक 37 हजार नवीन रुग्ण आढळले. एकाच दिवसात आढळलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तसेच  बिल गेट्स यांच्या बिल अँड मिलिंडा गेटस फाऊंडेशनच्यावतीने करोनाची लस विकसित करण्यासाठी 40 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 3 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात प्लाझ्मा थेरपी किती प्रभावी?, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

"सत्तेच्या हव्यासापोटी देशात लागू केली आणीबाणी, एका रात्रीत संपूर्ण देशाचा केला तुरुंग"

CoronaVirus News : 7 दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 कोटीवर?, WHO ने दिला गंभीर इशारा

CoronaVirus News : 'मातोश्री' परिसरात कोरोनाचा शिरकाव; मुख्यमंत्र्यांच्या बाजूच्या बंगल्यात सापडला रुग्ण

बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान

CoronaVirus News : श्वासोच्छवासाच्या योग्य पद्धतीने कोरोनावर करता येते मात; नोबेल विजेत्या तज्ज्ञाचा दावा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBill Gatesबिल गेटसAmericaअमेरिकाIndiaभारतDeathमृत्यू