CoronaVirus News : 7 दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 कोटीवर?, WHO ने दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 12:25 PM2020-06-25T12:25:11+5:302020-06-25T12:43:28+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे.

कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे.

एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली.

भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 485,122 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 95 लाख लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे.

येत्या 7 दिवसांत म्हणजेच पुढच्या आठवड्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तब्बल 1 कोटींवर पोहोचणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे.

WHO ने हा गंभीर इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेडरॉस अधनॉम यांनी पुढच्या आठवड्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या एक कोटींवर पोहोचू शकते असं म्हटलं आहे.

कोरोनाची लस आणि औषधे यावर संशोधन चालू आहे. लस कधी येणार याबाबत अद्याप काही सांगता येत नाही मात्र हा वेगाने पसरणारा संसर्ग कसा रोखता येईल आणि शक्य तेवढ्या लोकांचे जीव कसे वाचवता येतील यावर विचार करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हज यात्रेसंदर्भात घालण्यात आलेले निर्बंध हे संसर्गाचा विचार करून आहेत. हा निर्णय जोखीम आणि धोका लक्षात घेऊन करण्यात आला असल्याचं देखील टेडरॉस अधनॉम यांनी सांगितलं आहे.

महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत कोरोनाचा वेगाने संसर्ग होत आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे. तसेच मध्य आणि दक्षिण अमेरिकेत कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका सर्वाधिक आहे.

ब्रिटनने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेली व्यवस्था ही यामध्ये बरी असल्याचं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ही योजना सर्व देशांना लागू करण्याबाबत विचार करावा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोविड-19 वर प्रतिबंधक लस बनविण्यासाठी जगात अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे.

कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे.

गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशभरात एका दिवसात कोरोनाचे तब्बल 16,922 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 418 जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या चार लाख 73 हजारांच्यावर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 14,894 लोकांचा मृत्यू झाला आहे.