शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोनासमोर अमेरिका हतबल, बाधितांचा आकडा एक लाखांच्या पार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 09:29 IST

24 तासात अमेरिकेत सुमारे 18 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 345 जणांचा मृत्यू झाला आहे.

न्यूयॉर्क - संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूसमोर जागतिक महाशक्ती असलेली अमेरिका हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा  आकडा एक लाखांच्यापार पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 1544 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात अमेरिकेत सुमारे 18 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 345 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 717 एवढा झाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 ट्रिलियन डॉलरच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे. या मदत पॅकेजच्या माध्यमातून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीची भरपाई केली जाणार आहे. गेल्या चार दिवसात अमेरिकेत कोरोनाचे 50 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. तर जगात आतापर्यंत 5 लाख 91 हजार 802 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 26 हजार 995 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 29 हजार 790 जण उपचारानंतर बरे झाले आहे.कोरोनाची लागण झालेल्याच्या यादीत इटली दुसऱ्या स्थानी आहे. इटलीत आतापर्यंत 86 हजार 498 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 9 हजार 134 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात इटलीत 919 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnited StatesअमेरिकाHealthआरोग्य