शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

CoronaVaccine : आरोपांकडे दुर्लक्षकरत रशियाने सुरू केले कोरोना लसीचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 5:41 PM

रशियन आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की ही लस आवश्यक त्या सर्व परीक्षणांतून गेली आहे. तसेच कोरोनाविरोधात रोग प्रतिकारशक्ती विकसित करण्यास यशस्वी ठरली आहे.

ठळक मुद्देरशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की ते पुढील 12 महिन्यांत कोरोना लसीचे 50 कोटी डोस तयार करण्यास सक्षम आहेत.या लसीची 76 लोकांवर वेगवेगळी टेस्‍ट करण्यात आली आहे. WHO ने मागवली रशियन लसीची संपूर्ण माहिती.

मॉस्‍को - जागतीक आरोग्य संघटना आणि अमेरिकेसह पश्चिमेकडील काही देशांनी केलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करत रशियाने आपल्या 'स्‍पूतनिक' कोरोना लसीचे उत्पादन सुरू केले आहे. यासंदर्भात रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले, की गमलेया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या या लसीचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की ते पुढील 12 महिन्यांत कोरोना लसीचे 50 कोटी डोस तयार करण्यास सक्षम आहेत.

रशियन आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की ही लस आवश्यक त्या सर्व परीक्षणांतून गेली आहे. तसेच कोरोनाविरोधात रोग प्रतिकारशक्ती विकसित करण्यास यशस्वी ठरली आहे. ही लस दोन वेळा टोचली जाते. तसेच ती व्हायरसविरोधात साधारणपणे दोन वर्षांसाठी रोग प्रतिकारशक्ती विकसित करेल. या लसीची 76 लोकांवर वेगवेगळी टेस्‍ट करण्यात आली आहे. 

रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की या लसीचे उत्पादन लवकरच परदेशातही सुरू होईल. तसेच तिचे यूएई आणि फिलिपाइन्‍समध्ये ट्रायलही सुरू होत आहे. मात्र, ब्रिटिश वृत्तपत्र डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, रशियन लस कितपत प्रभावी आणि सुरक्षित असेल याची तपासणी करण्यात आलेली नाही. याशिवाय या लसीचे साईड इफेक्टदेखील दिसून आले आहेत.  राष्ट्रपती पुतिन यांनी स्वतः म्हटले होते, की त्यांच्या मुलीलाही ही लस टोचण्यात आली आहे.

WHO ने मागवली रशियन लसीची संपूर्ण माहिती - डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, केवळ 38 स्वयंसेवकांनाच ही लस देण्यात आली आहे. लस दिल्यानंतर त्यांच्यात 144 प्रकारचे साईड इफेक्ट्स दिसून आल्याचा दावाही वृत्तपत्रने केला आहे. एवढेच नाही, तर परीक्षणाच्या 42 व्या दिवसापर्यंत 31 स्वयंसेवकांत साईड इपेक्ट्स दिसून येत आहेत, असेही वृत्तपत्राने म्हटले आहे. मात्र, जगभरातून प्रश्न उपस्थित होत असतानाच, आमची कोरोनालास पूर्णपणे सुरक्षित असून 20 देशांनी लसीसाठी ऑर्डरदेखील दिली असल्याचे रशियाने म्हटले आहे. याशिवाय, रशियन वृत्तसंस्था फोटांकाने दावा केला आहे, की स्वयंसेवकांच्या शरिरात दिसून येणाऱ्या साइड इफेक्ट्सची यादी मोठी आहे.

रशियाने कोरोना लसीवर जगातील अनेक देशांनी शंका उपस्थित केली आहे. याशिवाय जागतीक आरोग्य संस्थेनेही रशियाकडे लसीसंदर्भात माहिती मागितली आहे. एवढेच नाही, तर रशियन सरकारने लसीसंदर्भात केलेले संशोधन जारी करावे, असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे. जगभरात लसीवर संशोधन करणाऱ्या कंपन्या सातत्याने डेटा जाहीर करत आहेत आणि यासंदर्भात WHO ला माहिती देत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

लाल किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी तैनात होते अँटी ड्रोन सिस्टिम, विशेष व्यवस्थेसह झाले पंतप्रधान मोदींचे भाषण

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन