शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 11:41 AM

Baramati Loksabha Election - बारामती मतदारसंघात मतदान सुरू असताना मविआच्या उमेदवार सुप्रिया सुळे या काटेवाडीतील अजित पवारांच्या घरी गेल्याची बातमी समोर आली आहे.

बारामती - Supriya Sule at Ajit Pawar Home ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. मात्र बारामतीच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. मतदान केंद्रावर मतदान करून सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी दाखल झाल्या आहेत. काटेवाडीतील अजित पवारांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे पोहचल्या. या राजकीय घडामोडीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

ऐन मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या घरी भेट दिल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. सुप्रिया सुळेंनी ही भेट का घेतली हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र सातत्याने सुप्रिया सुळेंकडून आमचे राजकीय मतभेद असले तरी कुटुंब म्हणून आम्ही एकच आहोत असं सांगत होते. त्यात सुप्रिया सुळे यांनी मतदानाच्या दिवशी अजित पवारांच्या घरी दाखल होणे यातून मतदारांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीच्या राजकीय आखाड्यात शरद पवार आणि अजित पवार एकमेकांसमोर उभे आहेत. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात अजित पवार महायुतीत आल्याने पवार कुटुंबातील वाद समोर आले. या निवडणुकीच्या प्रचारावेळी पवार कुटुंबातील सगळेच मैदानात उतरले होते. त्यात अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारही त्यांच्याविरोधात जात सुप्रिया सुळेंचा प्रचार करत होते. 

बारामतीच्या शेवटच्या सभेतही शरद पवार गटाकडून अजित पवारांवर निशाणा साधला होता. रोहित पवार यांनी आक्रमकपणे अजित पवारांवर टीका करत भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर रोहित पवारांच्या टीकेवर अजित पवारांनीही त्यांची खिल्ली उडवली होती. त्यात मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे या काटेवाडीतील अजित पवारांच्या निवासस्थानी गेल्याने कुटुंब म्हणून आजही आम्ही एकत्रित आहोत असा संदेश सुप्रिया सुळेंना द्यायचा आहे का असादेखील प्रश्न निर्माण होतो. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४baramati-pcबारामतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४