Corona Virus china to build designated hospital to treat corona virus patients | China Coronavirus : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी चीन उभारणार 10 दिवसांत रुग्णालय

China Coronavirus : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी चीन उभारणार 10 दिवसांत रुग्णालय

ठळक मुद्देचीन येत्या दहा दिवसांत नवीन रुग्णालय उभं करणार आहे. 25 हजार स्कवेअर मीटरमध्ये हे रुग्णालय उभे राहणार असून त्यामध्ये 1 हजार बेडची व्यवस्था.वुहान शहरात हे रुग्णालय उभारण्यात येणार.

बीजिंग - चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे भारत, अमेरिकेसहीत अनेक देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 830 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. चीनमध्येकोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातलं असून याचा सामना करण्यासाठी चीन येत्या दहा दिवसांत नवीन रुग्णालय उभं करणार आहे. वुहान शहरात हे रुग्णालय उभारण्यात येणार असून युद्धपातळीवर त्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.  

चीनमधील स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी रुग्णालय उभारण्यास सुरुवात झाली आहे. 25 हजार स्कवेअर मीटरमध्ये हे रुग्णालय उभे राहणार असून त्यामध्ये 1 हजार बेडची व्यवस्था असणार आहे. रुग्णालय उभारण्याचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. याआधी 2003 साली चीनने सार्सचा व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सात दिवसांच्या आत रुग्णालय उभारले होते.

कोरोना व्हायरसमुळे चीनने वुहान आणि हुआंगगांग ही दोन शहरे बंद करून टाकली आहेत. तेथील रहिवाशांना कारणाविना घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे. तसेच तेथील वाहतूक सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कोरोना व्हायरस सापातून माणसामध्ये संक्रमित झाल्याची शक्यता तेथील संशोधकांनी व्यक्त केली आहे. वुहान आणि हुआंगगांग या दोन्ही शहरांमध्ये बाहेरील लोकांना जायलाही सध्या परवानगी मिळणार नाही, असे तेथील सरकारने स्पष्ट केले आहे. या शहरांतील चित्रपटगृहे, दुकाने मॉल, बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. कमी कालावधीत जास्तीत जास्त लोक या आजाराने ग्रस्त होत असल्याने चीन सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

कोरोनाच्या संसर्गामुळे बळी गेलेल्यांमध्ये बहुतांश नागरिक वुहान व हुआंगगांग या शहरांतील असल्याने तेथील परिस्थितीवर चीन तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत.या शहरांत आवश्यकता असेल तरच जावे, अशी सूचना भारताने आपल्या नागरिकांना केली आहे. मात्र त्या शहरांत बाहेरील लोकांना तूर्त जाता येणार नाही. कोरोनाच्या संसर्गामुळे बळी गेलेल्यांमध्ये बहुतांश नागरिक वुहान व हुआंगगांग या शहरांतील असल्याने तेथील परिस्थितीवर चीन तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत.या शहरांत आवश्यकता असेल तरच जावे, अशी सूचना भारताने आपल्या नागरिकांना केली आहे. मात्र त्या शहरांत बाहेरील लोकांना तूर्त जाता येणार नाही.
Indian government take precautions aganist Corona virus | corona virus

महत्त्वाच्या बातम्या

Corona Virus : चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 25 जणांचा मृत्यू, 830 जणांना संसर्ग

Maharashtra Bandh Live: भाजपाने विरोध करुनही महाराष्ट्र बंद यशस्वी - आंबेडकर

Ind vs NZ, 1st T20 : पहिल्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर विजय

'मोटा भाई-छोटा भाईच्या तोंडी हिटलरची भाषा', मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

'पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांगलादेशींना ओळखलं', भाजपा नेत्याचं अजब विधान

 

 

Web Title: Corona Virus china to build designated hospital to treat corona virus patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.