शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाक लष्कर-पोलीस यांच्यामध्ये संघर्ष, यादवीची चिन्हे; सिंध प्रांतात प्रचंड तणाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 07:04 IST

सफदर यांची आता सुटका करण्यात आली असली तरी या अटक प्रकरणाने धक्का बसलेल्या कराचीतील काही पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी सुटीसाठी वरिष्ठांकडे अर्ज दाखल केले.

इस्लामाबाद :पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे जावई कॅप्टन मोहम्मद सफदर यांना कराची येथे अटक केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी दिले आहेत. सफदर प्रकरणामुळे सिंध पोलीस व लष्करात संघर्ष सुरू झाला असून, त्यातून यादवी माजण्याची शक्यता आहे. सफदर यांची आता सुटका करण्यात आली असली तरी या अटक प्रकरणाने धक्का बसलेल्या कराचीतील काही पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी सुटीसाठी वरिष्ठांकडे अर्ज दाखल केले. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, कॅप्टन मोहम्मद सफदर यांना अटक का करण्यात आली याची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोहम्मद सफदर व त्यांची पत्नी मरियम नवाज यांनी रविवारी कराचीमध्ये पार पडलेल्या विरोधी पक्षांच्या जाहीर सभेला हजेरी लावली. तिथे नवाज शरीफ यांची मुलगी व पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) या पक्षाच्या उपाध्यक्षा मरियम नवाज यांनी इम्रान खान यांच्याविरोधात जोरदार भाषण केले. त्यानंतर मरियम ज्या हॉटेलमध्ये उतरल्या आहेत तिथे जाऊन पोलिसांनी त्यांचे पती कॅप्टन मोहम्मद सफदर यांना सोमवारी अटक केली होती. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा अवमान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सफदर यांची जामिनावर मुक्तता केली.स्फोटामध्ये पाच ठार; २० जखमीकराचीमध्ये पोलीस व लष्करी अधिकाऱ्यांत काही ठिकाणी हिंसाचार झाल्याचे सांगण्यात आले. एका भागात झालेल्या स्फोटात पाच जण ठार व २० जण जखमी झाले. या स्फोटाच्या हादऱ्याने आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. ज्वलनशील वायूच्या गळतीमुळे हा स्फोट झाला, असे सांगण्यात येत असले तरी खरे कारण दडपण्यात येत असल्याचा संशय आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPoliceपोलिसImran Khanइम्रान खान