शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्राचीन जहाजाच्या अवशेषात टॅब्लेट कॉम्प्युटर मिळाल्याचा दावा

By admin | Updated: May 25, 2014 23:36 IST

प्राचीन जहाजाच्या अवशेषातून तुर्कस्तानी पुरातत्ववेत्त्यांनी

वॉशिंग्टन- प्राचीन जहाजाच्या अवशेषातून तुर्कस्तानी पुरातत्ववेत्त्यांनी १२०० वर्षांची एक लाकडी वस्तू शोधून काढली असून, हा जुन्या काळातील टॅब्लेट संगणक आहे, असा त्यांचा दावा आहे. तुर्कस्तानची राजधानी इस्तंबुलजवळील येनकापी भागात ३७ जहाजे वर काढण्यात आली आहेत. हे थिओडोसियस बंदर म्हणून ओळखले जाते. बायझेंटाईन सम्राट थिओडोसियस याने चौथ्या शतकात ते बांधले होते व व्यावसायिक बंदर म्हणून ते भरभराटीला आले होते. या लाकडी वस्तूच्या झाकणावर कोरीव काम केलेले आहे, त्याचा आकार सध्याच्या ७ इंची टॅब्लेटएवढा आहे; पण रुंदी जास्त आहे. हा जहाजाच्या कॅप्टनचा असण्याची शक्यता आहे. या पेटीवर पाच चौकोनी पॅनेल असून, त्यावर ग्रीक भाषेत मजकूर लिहिला आहे. डिस्कव्हरी वाहिनीने हे वृत्त दिले आहे. ज्या बुडालेल्या जहाजात हे उपकरण सापडले आहे, ते जहाज ९ व्या शतकातील आहे. ते काळ्या समुद्रात प्रवास करत होते, क्रिमियातून कर्सोनिआस येथे वस्तूंची वाहतूक करत होते असा अंदाज आहे.