शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी नागरिकांनी सज्ज राहावे- डोनाल्ड ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 1:17 AM

रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे त्या देशात कोरोनाच्या चाचणीसाठी आवश्यक असलेले संच, वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा भासत आहे.

वॉशिंग्टन : कोरोना साथीने हाहाकार माजविलेल्या अमेरिकेमध्ये आगामी दोन आठवडे अत्यंत वेदनादायी असण्याची शक्यता आहे, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात असूनही अमेरिकेमध्ये कोरोनामुळे भविष्यात एक लाख ते दोन लाख चाळीस हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशारा ट्रम्प सरकारने नुकताच दिला होता.

ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले, की अमेरिकेत अत्यावश्यक सेवा वगळून बाकीचे सारे व्यवहार व वाहतूक बंद ठेवण्याचा सरकारने घेतलेला निर्णय योग्यच होता, हे सध्याच्या घडामोडींवरून सिद्ध होत आहे. येत्या दोन आठवड्यांत आणखी विपरित परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येक अमेरिकी नागरिकाने सज्ज राहावे. हा कालावधी अत्यंत वेदनादायी असणार आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाच्या बळींची संख्या ३८०० वर पोहोचली आहे.

रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे त्या देशात कोरोनाच्या चाचणीसाठी आवश्यक असलेले संच, वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा भासत आहे. या स्थितीबद्दल ट्रम्प सरकावर जोरदार टीका होत आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना करूनही अमेरिकेत या साथीच्या बळींमध्ये मोठी वाढ होणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. हा आजार बरा करण्यासाठी कोणताही जादूचा उपाय किंवा रामबाण औषध उपलब्ध नाही. या संकटाचा अतिशय काळजी घेऊन व निर्धारानेच मुकाबला करावा लागेल, असे या तज्ज्ञांनी सांगितले. उपायांना येणार महिनाभराने यश?नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅलर्जी अँड इन्फेक्शन या संस्थेचे प्रमुख डॉ. अँथनी फौसी यांनी सांगितले, की कोरोनामुळे अमेरिकेत बळींचा आकडा वाढत असला तरी हे प्रमाण कमी करण्यासाठी अमेरिका सरकारने उचललेल्या पावलांना आगामी ३० दिवसांत नक्कीच यश येईल. अमेरिकेतील परिस्थिती गंभीर असल्याचे तज्ज्ञांनी वारंवार सांगूनही येत्या इस्टरपर्यंत देशातील आर्थिक व्यवहार पूर्ववत सुरू करण्याचा मानस डोनाल्ड ट्रम्प यांनी बाळगला होता. पण आता त्यांनी हा विचार दूर सारला असून अमेरिकेतील निर्बंधांची मुदत आणखी महिनाभराने नुकतीच वाढविली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प