शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

CoronaVirus: बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये सापडला जिवंत कोरोना; चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 6:09 PM

Coronavirus प्रकृती सुधारित असलेल्या कोरोना रुग्णांच्या तपासणीतून महत्त्वाची माहिती समोर

बीजिंग: जगभरात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. कोरोनामुळे ३८ हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्याप तरी जगभरातल्या शास्त्रज्ञांना कोरोनावरील लस शोधता आलेली नाही. याबद्दल चीनमध्येही संशोधन सुरू आहे. चीनमधील डॉक्टरांनी बऱ्या होणाऱ्या रुग्णाच्या थुंकी आणि विष्ठेतील कोरोनाचा जिवंत विषाणू शोधला आहे. याशिवाय रुग्णांना देण्यात येणाऱ्या डिस्चार्जबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कोरोनाबाधित व्यक्ती बरी होत असताना तिच्या घशातील लाळेची तपासणी केली जाते. ही चाचणी निगेटिव्ह आल्यावर रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो. मात्र त्याचवेळी अनेकदा रुग्णाची रियल टाईम फ्लुरोसन्स पिलमरेस चेन रिऍक्शन (आरटी-पीसीआर) चाचणी पॉझिटिव्ह येते. अॅनल्स ऑफ इंटर्नल मेडिसिन या जर्नलनं हे संशोधन प्रसिद्ध केलं आहे. आरटी-पीसीआर चाचणी शरीरातल्या आरअनए आणि डीएनएशी संबंधित आहे.कोरोनाबाधित व्यक्तींना वेगळं ठेवलं जातं. त्यांच्या सुधारणा दिसू लागल्यावर त्यांना रुग्णालयातच ठेवायचं की डिस्चार्ज द्यायचा याचा निर्णय घशाजवळील लाळेच्या चाचणीवरुन ठरतो. केवळ घशाजवळील लाळेच्या चाचणीवरुन रुग्णाला घरी सोडण्याचा निर्णय घ्यायचा का, असा प्रश्न बीजिंग डिटान रुग्णालय आणि कॅपिटल मेडिकल युनिव्हर्सिटीनं उपस्थित केला आहे. लाळेची चाचणी निगेटिव्ह आल्यानं व्यक्ती कोरोनामुक्त होते का, याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात आली आहे. याबद्दल अधिक संशोधन करण्यासाठी बीजिंग डिटान रुग्णालय आणि कॅपिटल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल आरटी-पीसीआरशी पडताळून पाहण्यात आले. घशाजवळील लाळेसोबत बऱ्या होत असलेल्या रुग्णाची थुंकी आणि विष्ठादेखील तपासून पाहण्यात आली. २० जानेवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत दाखल झालेल्या १३३ रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यातील २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे याच २२ जणांच्या घशाजवळील लाळेचे अहवाल निगेटिव्ह आले होते. चीनमधील डॉक्टरांनी केलेल्या या संशोधनानंतरही काही प्रश्न अनुत्तरितच आहेत. एखाद्या रुग्णाचा थुंकी किंवा विष्ठेशी संबंधित अहवाल निगेटिव्ह आल्यास तिच्या माध्यमातून इतरांना कोरोनाची लागण होऊ शकते का, या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. हे संशोधन अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीनं करण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे याविषयी आणखी संशोधन आवश्यक असल्याचं अधोरेखित झालं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या