शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चीनचा दुटप्पीपणा

By admin | Updated: June 4, 2015 23:39 IST

चीनने ‘दक्षिण चीन समुद्र’ हा भाग वादग्रस्त असल्याचे सांगत भारताच्या तेथील तेल उत्खननाला विरोध दर्शविला

बीजिंग : चीनने ‘दक्षिण चीन समुद्र’ हा भाग वादग्रस्त असल्याचे सांगत भारताच्या तेथील तेल उत्खननाला विरोध दर्शविला मात्र पाकव्याप्त काश्मिरातील आपल्या ४६ अब्ज डॉलरच्या आर्थिक कॉरिडॉर योजनेस उपजीविकेशी संबंधित योजना संबोधत तिचे समर्थन केले. भारतीय पत्रकारांनी वरिष्ठ चीनी अधिकाऱ्याशी केलेल्या वार्तालापात चीनचा हा दुटप्पीपणा समोर आला. भारत व चीन हे दोघेही दक्षिण चीन सागरातील मुक्त वाहतुकीचे समर्थन करतात. याबाबत कोणतेही मतभेद नाहीत, असे चिनी परराष्ट्र मंत्रालयातील आशियाई व्यवहार विभागाचे उपसंचालक हुआंग शिलियान यांनी भारतीय पत्रकारांना सांगितले. ते पुढे म्हणाले की, चीनची कंपनी भारताच्या वादग्रस्त क्षेत्रात काम करण्यास गेल्यास भारत त्याविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त करेल. त्याचप्रमाणे भारतीय कंपनी ओएनजीसीने व्हिएतनाम दावा करत असलेल्या दक्षिण चीन सागरात उत्खनन करण्यास चीनचा आक्षेप आहे. ओएनजीसीला व्हिएतनामची मुभा मिळाली. मात्र, चीनच्या आक्षेपामुळे उत्खनन रखडले आहे. ही योजना व्यावसायिक असून तिचे राजकारण करण्याची गरज नाही, असे भारताचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)दक्षिण चीन सागरात भारताने उत्खनन करण्यास तुमचा विरोध तुम्ही सैद्धांतिक मानता. मग तोच सिद्धांत तुमच्या पाकव्याप्त काश्मिरातील कॉरिडॉरसाठी लागू होत नाही का, असा सवाल केला असता ते म्हणाले की, ही कॉरिडॉर योजना राजकीय नसून लोकांच्या उपजीविकेसाठी आहे. चीनने संपूर्ण दक्षिण चीन सागरावर मालकीचा दावा केला असून चीनच्या या दाव्याला व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवानने आक्षेप घेतलेला आहे.