शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

"मला हवं, ते करेन...!" ट्रम्प यांच्या निर्णयावरून चीन भडकला, AI व्हिडिओ जारी करत उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:25 IST

ग्रीनलँड अमेरिकेच्या ताब्यात असेल, तरच त्याचे योग्य पद्धतीने संरक्षण केले जाऊ शकते. अमेरिका ते सोप्या पद्धतीने अथवा कठोर पावले उचलत मिळवेल.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून, त्यांचे धोरण आणि घेतलेले निर्णय सातत्याने चर्चेत आहेत. ट्रम्प यांनी एकापाठोपाठ एक अनेक देशांवर भरमसाठ टॅरिप आकारले. याशिवाय इतरही अनेक मोठे निर्णय घेतले. त्यांनी नुकतेच, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना राजधानी काराकास येथून ताब्यात घेतले. व्हेनेझुएला सरकार आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेसाठी धोकादायक बनत चालले होते. तसेच तेथून अमेरिकेविरोधात कटकारस्थान रचले जात होते, असे अमेरिकेचे म्हणणे होते. 

ट्रम्प यांचा आरोप आहे की, व्हेनेझुएला अमेरिकेत कोकेन आणि फेंटेनाइल सारख्या घातक ड्रग्सच्या तस्करीचा मार्ग बनला आहे. ही समस्या सोडवण्यासाठी मादुरो यांना पदच्चूत करणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर, मादुरो यांच्या धोरणांमुळे व्हेनेझुएलाच्या लाखो नागरिकांना आपला देश सोडून अमेरिकेत यावे लागले आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. याशिवाय, ट्रम्प सातत्याने ग्रीनलँडवर अमेरिकेचा अधिकार सांगत आहे. या घटनांनंतर, आता चीनने ट्रम्प यांच्या धोरणांवर आणि निर्णयांवर खिल्ली उडवत निशाणा साधला आहे.  

चिनी सरकारी माध्यमांनी उडवली खिल्ली - चीनच्या सरकारी माध्यमाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ट्रम्प यांच्या निर्णयांची अत्यंत भयंकर खिल्ली उडवण्यात आली आहे. व्हिडियोसोबत लिहिण्यात आले आहे, "मला वाटते, तेच करणार.' या व्हिडिओमध्ये ग्रीनलँडचामुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय कायद्याचीही व्यंग्यात्मक पद्धतीने खिल्ली उडवण्यात आली आहे. चीनचा हा व्हिडिओ, ट्रम्प यांच्या या आक्रमक परराष्ट्र धोरणाची आणि एकतर्फी निर्णयांची खिल्ली उडवत निशाणा साधणार आहे.

ग्रीनलँडसंदर्भात टोकाची भूमिका - ग्रीनलँडसंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणतात, रशिया आणि चीनला ग्रीनलँडवर कब्जा करण्यापासून रोखण्यासाठी, ग्रीनलँड अमेरिकेला आपल्या नियंत्रणात घ्यावे लागेल. केवळ भाड्याने घेणे पुरेसे नाही. ग्रीनलँड अमेरिकेच्या ताब्यात असेल, तरच त्याचे योग्य पद्धतीने संरक्षण केले जाऊ शकते. अमेरिका ते सोप्या पद्धतीने अथवा कठोर पावले उचलत मिळवेल.

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प