पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद हादरली; शुक्रवारच्या नमाजावेळी मशि‍दीत आत्मघातकी स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:23 IST2026-02-06T15:22:59+5:302026-02-06T15:23:47+5:30

स्फोटानंतर इस्लामाबाद पॉलीक्लिनिक, पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीआयएमएस) आणि सीडीए हॉस्पिटलमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

Bomb Blast in Pakistan capital Islamabad; Suicide blast in mosque during Friday prayers | पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद हादरली; शुक्रवारच्या नमाजावेळी मशि‍दीत आत्मघातकी स्फोट

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद हादरली; शुक्रवारच्या नमाजावेळी मशि‍दीत आत्मघातकी स्फोट

इस्लामाबाद - पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. शुक्रवारच्या नमाजावेळी इस्लामाबादच्या कासर-ए-खदिजातुल कुबरा शिया मशिदीत आत्मघातकी स्फोट झाला आहे. ज्यात अनेक लोक मारले गेलेत. या घटनेनंतर इस्लामाबादमध्ये इमरजेंसी लागू करण्यात आली आहे. एका व्यक्तीने मशि‍दीच्या गेटवर येऊन स्वत:ला बॉम्बने उडवल्याची माहिती काही रिपोर्टमधून समोर आली आहे.

द डॉनच्या रिपोर्टनुसार, इस्लामाबाद येथे आत्मघातकी हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय काही जण जखमी झालेत. इस्लामाबादच्या शहजाद टाउन परिसरातील टेरलाई इमाम बारगाह येथे हा स्फोट झाला. आतापर्यंत स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच सूचना पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहचले आहेत. 

स्फोटानंतर इस्लामाबाद पॉलीक्लिनिक, पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीआयएमएस) आणि सीडीए हॉस्पिटलमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला. पिआयएमएसच्या कार्यकारी संचालक (ईडी) यांच्या सूचनेनुसार रुग्णालयात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. मुख्य आपत्कालीन, ऑर्थोपेडिक, बर्न सेंटर आणि न्यूरोलॉजी विभाग सक्रिय करण्यात आले आहेत. जखमींना पिआयएमएस आणि पॉलीक्लिनिकमध्ये दाखल करण्यात येत आहे. 

Web Title : इस्लामाबाद में धमाका: जुमे की नमाज के दौरान मस्जिद में आत्मघाती हमला

Web Summary : इस्लामाबाद में जुमे की नमाज के दौरान एक शिया मस्जिद में आत्मघाती बम विस्फोट हुआ, जिसमें कई लोग हताहत हुए। बचाव कार्य जारी है और आपातकाल घोषित कर दिया गया है। घायलों के इलाज के लिए अस्पताल हाई अलर्ट पर हैं।

Web Title : Islamabad Rocked: Suicide Blast at Mosque During Friday Prayers

Web Summary : A suicide bombing at a Shia mosque in Islamabad during Friday prayers resulted in multiple casualties. Emergency declared as rescue operations are underway. Hospitals are on high alert to treat the injured.