शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

पेशावरमधील बॉलीवूड वारसा होणार जतन, कपूर हवेलीचा जीर्णोध्दार होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2020 1:49 AM

Bollywood heritage in Peshawar : १९८८ मध्ये ऋषी कपूर आणि रणधीर कपूर हे बंधूद्वय पाकिस्तानात आले होते, तेव्हा त्यांनी आपल्या वडिलोपार्जित घराला भेट दिली होती. याच्या आठवणी आजही शहरात काढल्या जातात.

पेशावर : बॉलीवूडमधील कपूर घराणे आणि दिलीपकुमार यांची वडिलोपार्जित घरे उत्तर पाकिस्तानातील पेशावर शहरात असून, हा अनोखा वारसा जतन करण्यासाठी तेथील सरकारने पावले उचलली आहेत. १९८८ मध्ये ऋषी कपूर आणि रणधीर कपूर हे बंधूद्वय पाकिस्तानात आले होते, तेव्हा त्यांनी आपल्या वडिलोपार्जित घराला भेट दिली होती. याच्या आठवणी आजही शहरात काढल्या जातात.पेशावरच्या ढाकी मुनवर शाह परिसरात कपूर घराण्याची हवेली आहे. ही एकेकाळी शहरातील सर्वांत उंच इमारत होती. याच हवेलीत १९२४ मध्ये राज कपूर यांचा जन्म झाला. कपूर हवेलीपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर दिलीपकुमार यांचे वडिलोपार्जित घर आहे. या घरात १९२२ मध्ये दिलीपकुमार यांचा जन्म झाला. कपूर हवेली पारंपरिक पेशावर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मूळ सहामजली असलेल्या या हवेलीचे आता चारच मजले मोडक्यातोडक्या अवस्थेत शिल्लक आहेत.पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या सरकारने ही दोन्ही घरे खरेदी करण्याचा तसेच त्यांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय गेल्याच महिन्यात घेतला आहे.विशेष म्हणजे पाकिस्तानात बॉलिवूड चित्रपटांवर बंदी आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला होता, तेव्हा ही बंदी पाक सरकारने  तली होती. खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या पुरातत्त्व व संग्रहालये विभागाचे संचालक अब्दुल समद यांनी सांगितले की, आम्ही पेशावरला भारत आणि मध्य आशियाला जोडणारा दुवा म्हणून विकसित करू इच्छितो. हे दोन महान अभिनेते पाकिस्तानातील पेशावर येथून भारतात गेले आणि मोठे स्टार झाले, हे वास्तव आम्ही प्रकाशात आणू इच्छितो. 

जागतिक पर्यटन केंद्र बनविणार2,500 वर्षांचा बहुसांस्कृतिक इतिहास पेशावरचा आहेे. दुर्दैवाने आम्हाला अस्थिरतेत ढकलण्यात आले. आम्ही पेशावरचे पुनरुज्जीवन करून जागतिक पर्यटन केंद्र बनवू इच्छितो. 

- ही दोन्ही घरे एका खाजगी व्यक्तीला विकली गेली होती. ही पाडण्याची या व्यक्तीची योजना होती. तथापि, पुरातत्त्व विभागाने २०१६ च्या पुरातत्त्व कायद्यान्वये त्याला स्थगिती दिली आहे. आता सरकार ही घरे खरेदी करणार आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानbollywoodबॉलिवूड