शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 02:32 IST

संबंधित रिपोर्टनुसार, एका स्टिल्थ बॉम्बर विमानाचे हवाईमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते.

इराणच्या अनुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर, अमेरिकने आपली सर्व बी-2 स्टील्थ बॉम्बर विमाने परतल्याचा दावा केला होता. मात्र आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यानुसार, अमेरिकेने दोन ग्रुपमध्ये बी-2 बॉम्बर विमाने रवाना केली होती. यांपैकी एका ग्रुपचे विमान अद्यापपर्यंत मिसौरी एअरबेसवर पोहोचलेले नाही. मिसौरी येथील व्हाइटमन एअरफोर्स बेसवरून अमेरिकेने दोन समूहांत विमाने रवाना केली होती. 

यांपैकी एका ताफ्याने पॅसिफिककडून पश्चिमेकडे उड्डाण केले होते. या गटाचे काम हल्ला करणे नव्हे तर केवळ इराणी सैन्याची दिशाभूल करणे असे होते. तर सात बी-२ विमानांच्या दुसऱ्या ताफ्याने पूर्वेकडे उड्डाण केले आणि याच गटाने इराणवर हल्ला केला. हल्ला करणारा ताफा ३७ तासांनंतर मिसूरी एअरबेसवर परतला. मात्र, दुसऱ्या ताफ्यातील विमानांच्या परतण्याची पुष्टी होऊ शकली नाही.

एका बी-2 बॉम्बरची इमर्जन्सी लँडिंग -संबंधित रिपोर्टनुसार, एका स्टिल्थ बॉम्बर विमानाचे हवाईमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. ते होनोलुलुमधील हिकम एअर फोर्स बेसजवळील डॅनियल के इनौये आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते. मात्र, हे विमान कोणत्या स्थितीत आहे, हे समजू शकले नव्हते. एवढेच नाही तर, विमानाचे आपत्कालीन लँडिंग का करण्यात आले? हे देखील सांगण्यात आले नाही.

अमेरिकेच्या या विशेष विमानाचे यापूर्वीही हवाईमध्ये आपत्कालीन लँडिंग झालेले आहे. 2022 मध्ये विमानाचा संपूर्ण ताफाच या विमानतळावर उतरला होता. 2021 मध्ये अशाच एका घटनेनंतर, एक बी 2 बॉम्बर विमान रिपेयरिंगसाठी कॅलिफोर्निया येथे नेण्यात आले होते. संबंधित रिपोर्टनुसार, अमेरिकेचे बी2 बॉम्बर विमान अद्यापही होनोलुलूमध्येच अडकलेले आहे. तत्पूर्वी, इराणने अमेरिकेचे एक विमान पाडल्याचा दावा एका इराणी सोशल मीडिया हँडलवर करण्यात आला होता. मात्र, अमेरिकेने हा दावा फेटाळला होता.

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाIranइराणfighter jetलढाऊ विमान