जपानमध्ये मोठी दुर्घटना: विमानाला आग लागली, दुर्घटनाग्रस्त विमानात होते ३५० पेक्षा अधिक प्रवासी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 03:57 PM2024-01-02T15:57:53+5:302024-01-02T16:05:10+5:30

प्रवाशांना सुरक्षितरित्या दुर्घटनाग्रस्त विमानातून बाहेर काढल्याची माहिती आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Big accident in Japan: Plane caught fire, more than 350 passengers were on board | जपानमध्ये मोठी दुर्घटना: विमानाला आग लागली, दुर्घटनाग्रस्त विमानात होते ३५० पेक्षा अधिक प्रवासी 

जपानमध्ये मोठी दुर्घटना: विमानाला आग लागली, दुर्घटनाग्रस्त विमानात होते ३५० पेक्षा अधिक प्रवासी 

Japan Plane Fire ( Marathi News ) : टोकियो शहरातील हनेडा विमानतळावर जपान एअरलाइन्सच्या एका विमानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागली तेव्हा विमानात ३५० हून अधिक प्रवासी होते. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रवाशांना सुरक्षितरित्या दुर्घटनाग्रस्त विमानातून बाहेर काढल्याची माहिती आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

टोकियो अग्निशमन विभागाने या दुर्घटनेबाबत माहिती देताना म्हटलं आहे की, JAL 516 या क्रमांकाचे विमान टोकियो विमानतळावरील धावपट्टीवर उतरल्यानंतर ही दुर्घटना घडली. दोन विमानांची धडक झाल्याने सदर विमानाला आग लागल्याची शक्यता आहे. परिवहन आणि पर्यटन मंत्रालयाकडून या आग प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Big accident in Japan: Plane caught fire, more than 350 passengers were on board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.