शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

Bangladesh: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा विरोध झाला हिंसक; ढाक्यात तैनात केले बॉर्डर गार्ड्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 3:18 PM

हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात Facebook ही करण्यात आलं बॅन, पाच जणांचा झाला मृत्यू

ठळक मुद्देहिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात Facebook ही करण्यात आलं बॅनपरिस्थिती नियंत्रणात असल्याची अधिकाऱ्यांची माहिती

सध्या भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी हे बांगलादेश दौऱ्यावर गेले आहेत. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्याला काही कट्टरपंथी लोकांनी विरोध केला आहे. कट्टरपंथी लोकांनी या त्यांच्या या दौऱ्याविरोधात आंदोलन सुरू केलं असून या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.  या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये बॉर्डर गार्ड्स तैनात करावे लागले आहेत. शनिवारी एका अधिकाऱ्यानं यासंदर्भातील माहिती दिली. बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका मशिदीतून शुक्रवारी सुरू झालेलं हे हिंसक आंदोलन हळहळू बांगलादेशच्या अनेक प्रमुख जिल्ह्यांमध्ये पसरलं. यामध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान, हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये फेसबुकवरही बंदी घालण्यात आली आहे. युझर्सच्या तक्रारीनंतर शुक्रवारी मध्यरात्रीपासून फेसबुक बंद करण्यात आलं. कारण सोशल मीडियावर अनेक हिंसक फोटो आणि रिपोर्ट शेअर केले जात होते, असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे शुक्रवारी रात्रीपासूनच बांगलादेशच्या बॉर्डर गार्ड्सना तैनात करण्यात आल्याची माहिती बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या प्रवक्त्यांनी दिली. बॉर्डर गार्ड बांगलादेश ही कायदा सुरव्यवस्था राखण्यासाठी एक आरक्षित एक निमलष्करी दल म्हणून काम करतं. परिस्थिती नियंत्रणात"गृह मंत्रालयाच्या निर्देशांनुसार आणि नागरिक प्रशासनाच्या सहाय्यतेनं देशातील निरनिराळ्या भागांमध्ये आवश्यक त्या संख्येत बॉर्डर गार्ड्सना तैनात करण्यात आलं आहे. गार्ड्सच्या तैनातीनंतर कोणत्याही प्रकारची हिंसक घटना घडली नाही. सध्या संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे," अशी माहिती लेफ्टनंट कर्नल फैजुर रहमान यांनी एएफपीशी बोलताना दिली. दरम्यान, त्यांनी किती गार्ड तैनात करण्यात आले आहेत याबाबत मात्र माहिती दिली नाही. "कट्टरतावादी इस्लामिक समूह हेफाज़ात-ए-इस्लामच्या चार सदस्यांचे मृतदेह चटगांव येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणण्यात आले. एका ग्रामीण भागात हिंसा भडकवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला," अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली. तर दुसरीकडे यावर हेफाज़ात-ए-इस्लामकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली. शुक्रवारी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. या समुहानं शिवारी राष्ट्रव्यापी आंदोलन आणि रविवारी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात आंदोलनाचा इशारा या समुहाच्या प्रवक्त्यानं दिला. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेशprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत