शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी अन् औषधे...ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफमुळे तुमच्यावर काय परिणाम पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 21:38 IST

America Tariff : भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या प्रत्येक वस्तुवर अमेरिकेने 26 टक्के शुल्क लादले आहे.

America Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के शुल्क लादले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकन बाजारात भारतीय वस्तू 26 टक्क्यांनी महागणार आहेत. यामुळे भारतीय उद्योगपतींना अमेरिकन उद्योगपतींशी करार करणे कठीण होणार आहे. या टॅरिफमुळे भारतीय निर्यात महाग होईल, ज्यामुळे भारतीय उत्पादनांची अमेरिकन बाजारपेठेत स्पर्धा करण्याची क्षमताही कमी होऊ शकते.

भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर 26 टक्के शुल्क लावण्यात आला आहे. आपल्या टॅरिफ धोरणाची घोषणा करताना अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, भारत खूप कठीण देश आहे. पीएम मोदींचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले की, मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत. मी त्यांना सांगितले की, तुम्ही आम्हाला योग्य वागणूक देत नाही. दरम्यान, ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के शुल्क लादले असले तरी, भारताने मात्र अमेरिकेवर 52 टक्के शुल्क लादले आहे.

भारताने 52 टक्के टॅरिफ लादल्यामपळेच, ट्रम्प यांनी 26 टक्के शुल्क लादले आहे. दरम्यान, ट्रम्प यांना व्यापार आणि इमिग्रेशनवर सवलत देऊनही भारताला हा मोठा धक्का बसला आहे. नवीन दरांमुळे इलेक्ट्रॉनिक्स, रत्ने आणि कपडे आणखी महाग होतील. मात्र, औषध उद्योगाला यातून सूट देण्यात आली आहे.

कोणत्या देशावर किती कर?अमेरिकेने भारतीय आयातीवरील 26 टक्के, युरोपीय युनियनवर वर 20 टक्के, जपान 24 टक्के आणि दक्षिण कोरियावर 25 टक्क्यांपेक्षा जास्त कर लादला आहे. मात्र, हे प्रमाण चीनच्या 54 टक्के आणि व्हिएतनामच्या 46 टक्क्यांपेक्षा कमी आहे. अमेरिकेची भारतासोबतची व्यापार तूट 46 अब्ज डॉलर्स आहे. या समस्येचे निराकरण होईपर्यंत टॅरिफ चालू ठेवावे, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. ट्रम्प प्रशासनाला खूश करण्यासाठी भारत 23 अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन आयातीवरील शुल्कात कपात करू शकतो.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारत