शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तेल निर्यातीसाठी पर्याय; दशकानंतर इराक-सीरिया सीमा मार्ग पुन्हा खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 13:09 IST

इराक आणि सीरियामधील एक अत्यंत महत्त्वाचा सीमा मार्ग तब्बल १० वर्षांनंतर सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आला.

इराक आणि सीरियामधील एक अत्यंत महत्त्वाचा सीमा मार्ग तब्बल १० वर्षांनंतर सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आला. या निर्णयामुळे क्षेत्रिय व्यापार आणि विशेषत: तेल निर्यातीला मोठी गती मिळण्याची अपेक्षा दोन्ही देश व्यक्त करीत आहेत. इराण युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक अनिश्चित बनली असताना, सीरियाने या मार्गाला तेल निर्यातीसाठी एक सुरक्षित ‘जमिनीवरील पर्याय’ म्हणून सादर केले आहे.

अमेरिका, इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे समुद्रमार्गे होणारी तेलाची वाहतूक कधीही थांबू शकते. अशा वेळी इराक आणि सीरियाने आपले जुने मार्ग पुन्हा सुरू करणे, हा जागतिक तेल बाजार स्थिर ठेवण्यासाठी उचललेले एक धोरणात्मक पाऊल मानले जात आहे. यामुळे इराकचे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर असलेले अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. एप्रिल ते जून या काळात दरमहा सुमारे ६.५ लाख मेट्रिक टन इंधन तेलाचे कंत्राट एसओएमओ कंपनीला मिळाले आहे. हे तेल सीरियामार्गे टँकरद्वारे या रस्त्याने नेण्याची शक्यता आहे.

या सीमा मार्गाचा इतिहास

- या मार्गाला इराकमध्ये ‘राबिया’ आणि सीरियामध्ये ‘यारुबियाह’ या नावाने ओळखले जाते.- २०११ मध्ये सीरियात असाद सरकारविरोधात यादवी युद्ध सुरू झाल्याने हा मार्ग बंद केला होता आला.- २०१४ मध्ये या भागावर ‘इस्लामिक स्टेट’च्या दहशतवाद्यांनी कब्जा केला होता. त्यानंतर इराकी कुर्द फौजांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला होता.

इराकसाठी ‘लाइफ लाइन’

इराकची अर्थव्यवस्था ९० टक्क्यांहून अधिक तेल उत्पन्नावर अवलंबून आहे. आतापर्यंत इराकची तेलनिर्यात होर्मुझच्या मार्गातून होत असे. मात्र, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हा मार्ग धोक्यात आला आहे. सीरियामार्गे जाणारा हा जमिनीवरील मार्ग आता इराकसाठी ‘लाइफलाइन’ ठरू शकतो.  आखातातील युद्धामुळे इराककडे इंधनाचा प्रचंड साठा साचला असून, हा साठा रिकामा करण्यासाठी सध्या इराकची मोठी ओढाताण होत आहे.  

इराणी जहाजाशी संबंध नाही; चीनचे स्पष्टीकरण

आखाती प्रदेशात अमेरिकेने जप्त केलेल्या आणि क्षेपणास्त्र बनविण्यासाठी लागणारे रासायनिक पदार्थ वाहून नेणाऱ्या इराणी मालवाहू जहाजाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे चीनने मंगळवारी स्पष्ट केले. अमेरिकेच्या माजी संयुक्त राष्ट्रातील दूत निक्की हेली यांनी केलेल्या आरोपांनंतर चीनने ही आक्रमक भूमिका घेतली आहे. हे जहाज दुसऱ्या देशाचे असून, चीनला यात विनाकारण ओढण्याचे व अफवा पसरवू नका, असे चीनने म्हटले आहे. 

शरीफ, मुनीरना ‘नोबेल’ द्या

आखातीतल तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानच्या मुत्सद्दी प्रयत्नांची दखल घेत, पंतप्रधान शहबाज शरीफ व लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांना शांततेचे नोबेल पारितोषिक द्यावे, अशी मागणी करणारा प्रस्ताव खैबर पख्तूनख्वा विधानसभेत पीएमएल-एनच्या आमदार फराह खान यांनी मंगळवारी मांडला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iraq-Syria border reopens after a decade, alternative oil export route.

Web Summary : Iraq and Syria reopen a key border crossing after 10 years, boosting trade and oil exports. It offers a safer land route amid Persian Gulf tensions, reducing Iraq's reliance on Hormuz Strait. China denies link to seized Iranian ship.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIranइराण