एअर इंडियाची विनाथांबा सेवा

By Admin | Updated: December 13, 2015 22:54 IST2015-12-13T22:54:31+5:302015-12-13T22:54:31+5:30

एअर इंडियाने २०१६ च्या अखेरपर्यंत वॉशिंग्टनला विनाथांबा विमानसेवा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही त्याची पाचवी विनाथांबा सेवा असेल.

Air India's Unauthorized Services | एअर इंडियाची विनाथांबा सेवा

एअर इंडियाची विनाथांबा सेवा

सॅन फ्रान्सिस्को : एअर इंडियाने २०१६ च्या अखेरपर्यंत वॉशिंग्टनला विनाथांबा विमानसेवा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही त्याची पाचवी विनाथांबा सेवा असेल. सॅन फ्रान्सिस्कोला एअर इंडियाने नुकतीच थेट सेवा सुरू केली आहे.
ही सेवा किती टिकाव धरू शकेल याचा अभ्यास येत्या काही महिन्यांत पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर आम्ही पुढे सरकू. सगळेच व्यवस्थित झाले तर आम्ही थेट वॉशिंग्टनला पुढील वर्षीच्या अखेरपर्यंत सेवा देऊ, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सध्या एअर इंडियाची विनाथांबा सेवा शिकागो, न्यूयॉर्क व सॅन फ्रान्सिस्को आणि मुंबईहून नेवार्क येथे सुरू आहे. या आधी एअर इंडियाने न्यूयॉर्कमार्गे वॉशिंग्टनला सेवा दिली होती; परंतु ती बंद करण्यात आली.

Web Title: Air India's Unauthorized Services