शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

चबाहर बंदर विकासासाठी इराणसोबत करार

By admin | Updated: May 24, 2016 00:49 IST

भारताने सोमवारी इराणसोबत सैनिकी डावपेचांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा चबाहर बंदर करार केला. या करारामुळे भारताला पाकिस्तानला टाळून अफगाणिस्तान आणि युरोपमध्ये

तेहरान : भारताने सोमवारी इराणसोबत सैनिकी डावपेचांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा चबाहर बंदर करार केला. या करारामुळे भारताला पाकिस्तानला टाळून अफगाणिस्तान आणि युरोपमध्ये प्रवेश करता येईल. उभय देशांनी एकत्रितपणे दहशतवादाशी लढण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याचेही मान्य केले. चबाहर बंदराचा विकास करण्यासाठी भारत ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. माल वाहतुकीसाठी भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिपक्षीय करारही झाला. या करारामुळे इतिहासाची गती बदलणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी म्हटले. इराणशी द्विपक्षीय करार व्हायच्या आधी मोदी आणि इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांच्यात तपशिलाने चर्चा झाली. अ‍ॅल्युमिनियम प्लांट उभारणे आणि भारताला अफगाणिस्तान आणि मध्य अशियात प्रवेश करता यावा यासाठी रेल्वेमार्ग तयार करण्यावरही चर्चा झाली. इराणशी करार करण्याचा हेतू हा अर्थ, व्यापार, वाहतूक, बंदर विकास, संस्कृती, विज्ञान आणि शैक्षणिक सहकार्य या क्षेत्रांत अधिक सहकार्य वाढविण्याचा आहे. गेल्या १५ वर्षांत भारताच्या पंतप्रधानांनी प्रथमच इराणला भेट दिली आहे. इराणच्या दक्षिणेकडील चबाहर बंदर विकसित करण्यासाठीच्या पहिल्या टप्प्याचे कंत्राट भारताला या कराराने मिळाले. चबाहर बंदर सिस्टॅन-बलुचिस्तान प्रांतात आहे. या बंदराला भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडून सहजपणे जाता येते व या मार्गाने पाकिस्तानलाही टाळता येते.